काही लोक नौटंकी करत आहेत : फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

Devendra Fadanvis : एका चिठ्ठीचा तरी पुरावा आदित्य ठाकरे दाखवू शकतात का ?
Aditya Thackeray, Devendra Fadnavis
Aditya Thackeray, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

पुणे : 'वेदांत फॉक्सकॉन' प्रकरणी वाद-विवाद थांबताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. "काही लोक नौटंकी करत आहेत. सरकार असताना त्यांनी औद्योगिक वातावरण चांगल्या प्रकारे राखले नाही, मात्र हे काम आता आम्ही आमच्या काळात जरूर करू, महाराष्ट्राला टॉप मोस्ट इन्व्हेस्टमेंट सेंटरमध्ये नेऊन दाखवू, अशा शब्दात फडणवीसांनी आदित्य यांना सुनावले.

Aditya Thackeray, Devendra Fadnavis
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा खरचं दिल्या का; फॉरेन्सिक विभाग लावणार सोक्षमोक्ष !

आदित्य यांनी मेडिसिन डिव्हाईस पार्क उद्योगसुद्धा गुजरातला गेल्याचा दावा केला होता. यावर फडणवीस म्हणाले, "माझा त्यांना सवाल आहे की, मेडिसिन डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात येणार होता याचा एक चिठ्ठीचा तरी पुरावा ते दाखवू शकतात का ? सरकारमध्ये असताना अडीच वर्षात त्यांनी काही केलं नाही. अडीच वर्षे केंद्र सरकारला शिव्या देणे, एवढेच काम त्यांनी केले आणि आता मनाला वाटेल ते बोलत आहेत. रोज रोज खोटं बोलून, खोटं रेटून महाराष्ट्र पुढे जाणार नाही. आम्ही हिमतीने महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट आणली आणि पुढेही आणत राहू, असे फडणवीस म्हणाले.

राज्यात चर्चेत असणाऱ्या कथित पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा यावरही फडणवीसांनी प्रतिकीया दिली आहे. पीएफआयच्या विरोधात जी कारवाई केली आहे त्याचे पुरावे समोर आहेत. महाराष्ट्रात यांच्या ऍक्टिव्हिटी आम्ही ट्रॅक करत होतो. त्याचा शोध घेत होतो. केरळ राज्याने देखील या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. देश विरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पीएफआय संघटनेवर बंदी संदर्भात केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे फडणवीस म्हणाले.

Aditya Thackeray, Devendra Fadnavis
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं : पालघर जिल्हाप्रमुखानंतर उपजिल्हाप्रमुखांचाही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही त्यांनी भाष्य केले. "नाना पटोले दिवसभरात अनेक विनोद करत असतात, ते तुम्ही ऐकायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा. त्यांच्या विनोदावर आम्हाला प्रतिक्रिया कशाला विचारता कारण ते बेताल बोलत राहतात. बेताल बोलणाऱ्यांवर उत्तर द्यायला मला वेळ नाही, अशी फडणवीसांनी पटोलेंची खिल्ली उडवली

पालकमंत्री पदाच्या नियुक्तिवर विरोधपक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर टीका केली होती. पवार म्हणाले की, एका जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळताना नाकी नऊ येतात, फडणवीसा सहा जिल्हे कसे सांभाळणार काय माहिती? यावर फडणवीसांवर म्हणाले, मी त्यांना (अजित पवार) गुरुमंत्र देईल. येत्या काळात जर त्यांचे राज्य आलं आणि त्यांना जर दोन-चार जिल्हे ठेवायचे असले तर ते त्यांना कसे करायचे याचं गुरु मंत्र देईन.नियोजन मंत्री म्हणून माझ्याकडे सगळे जिल्हे आहेत. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे मग ६ जिल्ह्यांचे काय घेऊन बसलात, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com