Imran Khan News : इम्रान खान यांच्या घराबाहेर पोलिसांचा घेराव ; लष्कराने दिले हे दोन पर्याय

Pakistan Army : लष्कर आणि सरकार त्यांना सोडण्याच्या मनस्थितीत नाही.
Pakistan Former PM Imran Khan
Pakistan Former PM Imran KhanSarkarnama

Pakistan Army gave Two OptionsImran Imran Khan : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) प्रमुख इम्रान खान यांच्या अडचणीत वाढतच आहेत. नऊ मे रोजी इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. (imran khans difficulties increased pakistan army gave two options)

सध्या परिस्थितीनुसार, इम्रान खान यांना पुन्हा एकदा अटक करण्यासाठी लष्कराची तुकडी त्यांच्या घराबाहेर जमा झाली आहे. त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. पाकिस्तानी लष्कराने त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत.

Pakistan Former PM Imran Khan
Karnataka new CM : सिद्धरामय्या 'AHINDA' मुळे झाले मुख्यमंत्री ; पक्षश्रेष्ठींचा विश्वास जिंकला.. 'AHINDA' म्हणजे काय ?

इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पाकिस्तानी लष्कराच्या त्यांच्याविरोधात प्रचंड राग आहे. संतापलेल्या लष्कराने इम्रान खान यांनासमोर दोन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय म्हणजे दुबई, लंडनला जा किंवा लष्कराच्या कायद्यानुसार खटल्याला सामोरे जा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील कुठला पर्याय इम्रान खान स्वीकारतात, हे लवकरच समजेल.

Pakistan Former PM Imran Khan
Pune News : उद्धव ठाकरेंना करायला लावलं जी रे जी..! ; बावनकुळेंकडून नितेश राणेंचं कौतुक..

नऊ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून इम्रान खान यांना नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती. त्यानंतर पीटीआय समर्थकांनी पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी जाळपोळ केली होती. लष्करी अधिकाऱ्यांची घरे जाळली होती.

12 मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अल कादिर ट्रस्ट प्रकरणी इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर करताना अधिकाऱ्यांना 15 मे पर्यंत देशात कोठेही नोंदवलेल्या कोणत्याही प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यापासून दिलासा दिला आहे. ॉ

तरीही लष्कर आणि सरकार त्यांना सोडण्याच्या मनस्थितीत नाही. सध्या इम्रान खान यांच्या घराला पोलिसांनी घेराव घातला आहे. ही माहिती मिळताच इम्रान यांचे समर्थकही त्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com