UP Late Woman Won Election: निवडणुकीला अर्ज भरला पण निकालाआधीच तिला मृत्यूने गाठलं; मतदारांनी वाहिली अनोखी श्रद्धांजली !

Voters Elect Woman Who Dies Before Election In UP: नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी चक्क मृत उमेदवाराला निवडून दिले
UP Late Woman Won Election
UP Late Woman Won ElectionSarkarnama

Uttar Pradesh: कर्नाटक विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेशामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. पण या निवडणुकीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील अमरोहाच्या हसनपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी चक्क एका मृत उमेदवाराला निवडून दिले आहे. त्यामुळे आता या प्रकाराची चांगलीच चर्चा होत आहे.

UP Late Woman Won Election
Bhandara District APMC : सभापती निवडीच्या तारखा ठरल्या, सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा; फोडाफोडीत कोण समोर?

अमरोहाच्या हसनपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आशिया या 25 वर्षीय तरुणीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण निवडणुकीच्या मतदानापूर्वीच आशियाचा मृत्यू झाला. यानंतरही परिसरातील जनतेने आशियाला मतदान केलं.

UP Late Woman Won Election
Abu Azmi News : मुस्लिम वोट बॅंकेसाठी सपा मैदानात, अबू आझमींनी घेतली बैठक..

निकाल समोर आल्यानंतर चक्क आशिया या निवडणुकीत निवडून आली. मतमोजणी झाल्यानंतर आशिया जिंकल्याची माहिती समोर आली. त्यावेळी अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

फुफ्फुस आणि पोटाच्या संसर्गामुळे आशियाचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. तर आशिया मृत्यूनंतरही निवडून आल्यामुळे लोकांच्या हृदयात जिवंत राहिली आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com