Abu Azmi News : मुस्लिम वोट बॅंकेसाठी सपा मैदानात, अबू आझमींनी घेतली बैठक..

Marathwada : जुन्या शहरांची नावे बदलण्यापेक्षा नवी शहरे निर्माण करा आणि त्याला तुम्हाला हवे त्यांचे नाव द्या.
Abu Azmi, News
Abu Azmi, NewsSarkarnama

Samajwadi Party : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी (Abu Azmi) यांनी आपला मोर्चा छत्रपती संभाजीनगरकडे वळवला आहे. आगामी महापालिका, विधानसभा निवडणुका पाहता मुस्लिम वोट बॅंकेचा काही वाटा आपल्या पक्षाकडे वळवता येतो का ? याची चाचपणी आझमी यांनी शहरात मेळावा आणि बैठकांच्या माध्यमातून केली.

Abu Azmi, News
Pankaja Munde Letter To CM: हज यात्रेकरूंसाठी मुंबई विमानतळाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, मुख्यमंत्र्यांना पत्र..

एमआयएम ही भाजपची टीम आहे, त्यांनी कोणत्या राज्यात किती जागा लढवायच्या, कुठून उमेदवार उभे करायचे, उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय अमित शहाच घेतात, असा गंभीर आरोप देखील आझमी यांनी केला. यावरून सपाचे लक्ष्य एमआयएम (Aimim) असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. आबू आझमी नुकतेच शहरात येवून गेले, त्यांनी समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) नव्याने शहर व जिल्ह्यात उभारी देण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.

मौलाना अब्दुल कलाम रिसर्च सेंटरमधील मेळाव्यात त्यांनी भविष्यात आपल्या पक्षाची दिशा काय असेल हे देखील स्पष्ट केले. गेली कित्येक वर्ष काॅंग्रेस सोबत असलेली मुस्लिम वोट बॅंक आता विखुरली गेली आहे. (Abu Azmi) जुने-जानते लोक अजूनही काॅंग्रेसची साथ सोडायला तयार नसले तरी तरुणांनी मात्र काॅंग्रेसला पर्याय म्हणून एमआयएमचा स्वीकार केल्याचे चित्र आहे.

परंतु एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, त्यांच्या उमेदवारांमुळे इतर पक्षांचे उमेदवार पडतात आणि त्याचा थेट फायदा भाजपला होता, असा आरोप देखील आझमी यांनी केला. देशात मुस्लिम मतांचा टक्का निर्णयक असतांना देखील सध्या मुस्लिम समाजाची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे आपल्या एकत्रितपणे या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर समाजाच्या भल्यासाठी राजकारण करा, असा सल्ला देखील त्यांनी विरोधकांना दिला.

यापुढे निवडणुकीत कोणाच्या पाठीशी उभे राहायचे हे ठरवण्यासाठी एक कमिटी स्थापन करा, ही कमिटी जो निर्णय घेईल, त्यालाच मुस्लिम समाजाने मतदान करावे. असे झाले तरच आपली किंमत इतर राजकीय पक्ष करतील. आपण एकजूट राहिलो तर आपल्याला न्याय मिळेल, मागण्या मान्य केल्या जातील, असे आवाहन देखील आझमी यांनी केले. शहरांची नावे बदलण्यावरून देखील त्यांनी भाजपला सुनावले. जुन्या शहरांची नावे बदलण्यापेक्षा नवी शहरे निर्माण करा आणि त्याला तुम्हाला हवे त्यांचे नाव द्या, असा टोलाही आझमी यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com