Nehru-Sawarkar Politics : 'युपी'च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सावरकरांचा समावेश; पंडित नेहरुंना वगळले

भाजपने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनकथांचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते.
Nehru-Sawarkar Politics : 'युपी'च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सावरकरांचा समावेश; पंडित नेहरुंना वगळले
Published on
Updated on

Uttar Pradesh Politics: जुलैपासून सुरू होणाऱ्या नवीन सत्रापासून, उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळ आपल्या विद्यार्थ्यांना भारतातील 50 महापुरुषांचे चरित्र आणि त्यांचा कार्यकाळ याबद्दल शिकवण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण मंडळाने स्वासंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासह ५० महान व्यक्तींची चरित्रे आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहेत. पण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चरित्र वगळण्यात आले आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पंडित जवाहरलाल नेहरूंना (Pandit Jahavarlal Nehru) वगळण्याच्या निर्णयाबाबत तेथील माध्यमिक शिक्षण मंत्री (स्वतंत्र प्रभार) गुलाब देवी यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. पंडित नेहरूंनी देशासाठी बलिदान दिले नाही, त्यामुळे त्यांना महापुरुषांच्या यादीतून वगळण्यात आल्याचं गुलाब देवी यांनी म्हटलं आहे.

Nehru-Sawarkar Politics : 'युपी'च्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सावरकरांचा समावेश; पंडित नेहरुंना वगळले
Sudhir Mungantiwar News : वाघाला हरवण्यासाठी सर्व प्राणी एकत्र आले, पण वाघाने डरकाळी फोडली की...

"आम्ही सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांसारख्या महान नेत्यांबद्दल विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही तर काय करायचं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर, आपल्या मुलांना भारतातील महान व्यक्तींच्या जीवनाची आणि त्यांच्या कालखंडाची माहिती करुन देण्याऐवजी त्यांना दहशतवाद्यांबद्दल शिकवायंच का, असा प्रतिप्रश्नही गुलाबदेवी यांनी उपस्थित केला आहे. (Uttar Pradesh Politics)

विद्यार्थ्यांना महावीर स्वामी, भारतरत्न महामना मदन मोहन मालवीय, राजा राममोहन रॉय, सरोजिनी नायडू आणि नाना साहेब यांचे चरित्रही शिकवले जाणार आहे. यूपी बोर्डाचे सचिव दिव्यकांत शुक्ला म्हणाले,"हा विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे आणि तो उत्तीर्ण होणेही आवश्यक आहे, परंतु हायस्कूल आणि इंटरमिजिएट परीक्षांच्या मार्कशीटमध्ये याचे गुण समाविष्ट केले जाणार नाहीत." (National Politics)

भारतीय जनता पक्षाने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या लोककल्याण संकल्प पत्रात महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनकथांचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, चरित्रांमध्ये आध्यात्मिक नेते स्वामी विवेकानंद, आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती आणि लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक पंडित श्रीराम शर्मा यांचाही समावेश आहे. ही चरित्रे इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतच्या 'खेल, योग आणि नैतिक शिक्षण' या पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com