काँग्रेसला झटका; पक्षासाठी काम करणाऱ्या कंपनीवर 'प्राप्तीकर'चा छापा

एकूण सात ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे.
Congress
Congress File Photo

नवी दिल्ली : काँग्रेससाठी (Congress) काम करणाऱ्या डिजिटल कंपनीवर प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी केली आहे. चंदीगड, मोहाली, सूरत, बेंगलुरूसह एकूण सात ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. तसेच कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या हॉटेलमध्ये खोलीचीही तपासणी करण्यात आल्याचे समजते.

Design Boxed असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीकडून आसामसह अन्य काही राज्यांमध्ये निवडणूक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटिंगचे काम केले जाते. प्राप्तीकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीदरम्यान अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यामध्ये बेहिशेबी उत्पन्न व संपत्तीच्या हस्तांतरणाचे पुरावे आहेत. कंपनीकडून एंट्री ऑपरेटरद्वारे गैरप्रकार केले जात होते. हवालाद्वारे व्यवसाय करण्याचे आरोपही कंपनीवर आहेत.

Congress
तीन पिढ्यांचं कुटुंब एका क्षणातच ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं!

कंपनीने कर चोरीच्या उद्देशाने कमी उत्पन्न दाखवले आहे. तसेच झालेला खर्चही वाढवून दाखवण्यात आल्याचे दिसत आहे. रोख व्यवहारांमध्येही या कंपनीने पाय खोलात असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. कंपनीच्या संचालकांचा खर्चही कंपनीच्या खर्चामध्ये दाखविण्यात आल्याचे उपलब्ध कागदपत्रांमधून आढळल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

कंपनीचे संचालक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वापरासाठी लक्झरी गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. या गाड्या कंपनीचे कर्मचाऱ्यांच्या नावे खरेदी करण्यात आल्या आहेत. ही छापेमारी 12 ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. याबाबत माहिती आता समोर येऊ लागली आहे.

Congress
त्या एवढ्या मोठ्या नाही, या पवारांच्या वक्तव्यावर पंकजांचा पलटवार

दरम्यान, महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून प्राप्तीकर विभाग, ईडी, सीबीआयकडून अनेक नेते व नातेवाईकांच्या घरी छापे टाकले जात आहे. नुकतेच प्राप्तीकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या नातेवाईकंच्या घरी तसेत साखर कारखान्यावर छापे टाकले होते. सलग चार-पाच दिवस ही छापेमारी सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com