Karnatak Election 2023: 'त्या' ११ बंडखोर आमदारांच्या संपत्तीत वाढ; पण एवढी संपत्ती आली कुठून?

Karnatak Election 2023 |निवडणुकीसाठी पक्षाचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अर्ज दाकल करताना त्यांनी आपल्या मालमत्तेची माहितीही प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
Karnatak Election 2023 |
Karnatak Election 2023 | Sarkarnama
Published on
Updated on

Karnatak Elelction 2023 : कर्नाटकचे 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार उलथून टाकत 11 आमदारांनी बंडखोरी केली. काँग्रेस आणि जेडीएसमधून भाजपमध्ये आल्यानंतर मंत्रिमंडळात सामील झालेल्या 11 बंडखोर आमदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. 11 बंडखोर आमदारांच्या स्थावर मालमत्ता आणि वारसाहक्कात मोठी वाढ झाल्याची माहिती मिळाली असून बहुतांश नेत्यांनी या संपत्ती आपल्या पत्नींच्या नावावर नोंदवल्या आहेत. (Increase in wealth of 'those' 11 rebel MLAs; But where did this wealth come from?)

पाच वर्षात आमदारांची संपत्ती वाढली

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 2018 मध्ये जेव्हा आरोग्यमंत्री डॉ. के.के. सुधाकर यांनी निवडणूक लढवली तेव्हा त्यांची जंगम मालमत्ता 1.11 कोटी रुपये होती, ती आता 2.79 कोटी रुपये झाली आहे. तसेच त्यांची स्थावर मालमत्ता जी पूर्वी ५२ लाख ८१ हजार रुपये होती, ती आता १ कोटी ६६ लाख रुपये झाली आहे. सुधाकर यांच्या पत्नीची स्थावर मालमत्ता 2018 मध्ये 1 कोटी 17 लाख रुपयांच्या जवळपास होती, ती आता केवळ पाच वर्षांत 16 कोटी 10 लाख रुपयांवर पोहोचली आहे.

Karnatak Election 2023 |
Karnatak Election 2023: कोलार विधानसभा मतदारसंघ एवढा महत्त्वाचा का? जाणून घ्या कारण

दुसरीकडे महेश कुमातहल्ली यांची 2018 मध्ये 18 लाख 93 हजार रुपयांची मालमत्ता आता 1 कोटी 33 लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर सहकार मंत्री एस.टी.सोमशेकर यांची संपत्ती जी 2018 मध्ये 67.83 लाख रुपये होती ती 2023 मध्ये वाढून 5.46 कोटी रुपये झाली आहे. (Karnatak Election 2023)

पत्नींच्या नावावरही मालमत्ता नोंदणीकृत

पत्नीची संपत्ती जाहीर न केलेल्या अनेक नेत्यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्र सादर केले आहे. यापैकी एक, बी.ए. बसवराजू यांनी सांगितले की त्यांच्या पत्नीकडे 56.57 लाखांची जंगम आणि 21.57 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. (Karnatak Elelction 2023)

Karnatak Election 2023 |
Karnatak Election 2023 : कर्नाटकात कोणाचं सरकार येणार? शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं...

कृषी मंत्री बी.सी. पाटील यांच्याकडे 2018 मध्ये 3.12 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती, 2023 मध्ये आता त्यांची 19.60 कोटी रुपयांची झाली आहे.यात व्यावसायिक कॅम्पस आणि घरे या मालमत्तांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ दर्जा आणि पगारवाढ यामुळे संपत्ती वाढल्याचे कारण राजकारण्यांनी दिले आहे. संपत्तीत इतकी वाढ झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com