Narendra Modi on Crime against Women : महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरून PM मोदी आक्रमक; दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की...

78th Independence Day 2024 Narendra Modi On Violence against women : महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
Independence Day 2024 narendra Modi
Independence Day 2024 narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Independence Day 2024 narendra Modi : भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त (78 Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलेच भाषण आहे. तर सलग 11 वेळेस देशाला संबोधित करत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त, लाल किल्ल्यावरून आपल्या भाषणात, विकसित भारताचा (BJP) संकल्प, भाजप सरकारचे काम आणि इतर गोष्टींबद्दल सांगितले. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना महिला आणि मुलींवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

मोदी म्हणाले, "आपण आता महिला अत्याचाराबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे. महिला आणि मुलींवर अत्याचार होत आहेत. त्याविरोधात समाजात संताप आहे. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. राक्षसी कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. दोषींना अशी शिक्षा झाली पाहिजे की "गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे. गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण करण्याचीही आता गरज आहे.

आपल्या माता, बहिणी, मुलींवर होत असलेल्या अत्याचारांचा समाज म्हणून विचार करायला हवा. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये रोष आहे. राज्य सरकारला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.

Independence Day 2024 narendra Modi
Independence Day 2024 : देशाला 'कम्युनल' नाहीतर, 'सेक्युलर कोड'ची गरज; पंतप्रधान नरेंद्र मोदी

'लोकांमध्ये भीती निर्माण करणे आवश्यक आहे'

महिलांवरील गुन्ह्यांचा (Violence against women) लवकरात लवकर तपास व्हावा आणि आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा त्यांची खूप चर्चा होते. पण हा गुन्हा करणाऱ्या राक्षसी माणसाला शिक्षा झाली की त्याच्यावर कोणी फार चर्चा करत नाही. महिला अत्याचाराविरोधात व्यापक चर्चा होणे आता काळाची गरज आहे. अत्याचार करणाऱ्या लोकांमध्ये शिक्षे विषयी भीती निर्माण करणे आवश्यक आहे. गुन्हा करणार्‍यांना फासावर लटकवले पाहिजे.

Independence Day 2024 narendra Modi
PM Narendra Modi : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी केलं भाष्य; म्हणाले...

दरम्यान, पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकाळात कायद्यात केलेल्या बदलांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, आमच्याकडे शतकानुशतके असलेले गुन्हेगारी कायदे आम्ही न्यायिक संहितेच्या रूपात आणले आहेत. 'शिक्षा नव्हे, तर नागरिकाला न्याय' ही भावना महत्त्वाची आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com