INDIA Alliance : मोदी है तो मुमकिन है! इंडिया आघाडीतील खासदारानेच दिला नारा

Election News : खासदार सुनिल कुमार पिंटू यांनी मोदींचे कौतूक केले आहे.
MP Sunil Kumar Pintu
MP Sunil Kumar PintuSarkarnama
Published on
Updated on

Election Results 2023 : इंडिया आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवानंतर तर आघाडीतील अनेक नेत्यांनी उघडपणे टीका सुरू केली आहे. हे एवढ्यावरच थांबलेले नाही. एका घटक पक्षाच्या खासदाराने थेट ‘मोदी है तो मुमकिन है’ असा नारा दिला आहे. त्यामुळे आघाडीतील नेत्यांमध्ये नेमकं चाललंय काय?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

इंडिया आघाडीला (INDIA Alliance) एकत्रित करण्यात महत्वाची भूमिका निभावलेले बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या संयुक्त जनता दलाचे खासदार सुनिल कुमार पिंटू (MP Sunil Kumar Pintu) यांनी मोदींचे कौतूक केले आहे. ते बिहारमधील सीतामरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

MP Sunil Kumar Pintu
Telangana Election: रेड्डी यांना मुख्यमंत्री करण्याबाबत एकमत होईना...

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये दणदणीत विजय मिळाल्यानंतर भाजप खासदारांकडून सोमवारी लोकसभेत पुन्ही ‘मोदी है तो मुमकिन है’ च्या घोषणा देण्यात आल्या. त्याचीच री खासदार पिंटू यांनीही ओढली. ते म्हणाले, ‘निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर ‘मोदी है तो मुमकिन है’ असेच चित्र दिसते. भाजपने विधानसभा निवडणुकीतही ही घोषणा दिली होती.’

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पिंटू यांच्या या वक्तव्यामुळे जेडीयूसह आघाडीमधूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. पक्षाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी पिंटू यांच्यावर पंतप्रधान मोदींचा प्रभाव असेल तर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीआधी खासदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याचे दिसते. आपल्याला या बैठकीची माहितीच नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे विधानसभेच्या निकालानंतर आघाडीमध्ये विसंवादाला सुरूवात झाली असून बैठकीत नेमके काय घडणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com