Assembly Election Result : सुपडा साफ होऊनही काँग्रेसला ‘स्ट्राइक रेट’ने दाखवला आशेचा किरण

Congress : पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट करत भाजप आणि काँग्रेसच्या मतांमधील फरकाचा आधार घेतला आहे.
Congress News
Congress NewsSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Election : मध्य प्रदेशसह राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. भाजपने या राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत सर्वांनाच चकित केले. या पराभवातही काँग्रेससाठी आशेचा किरण सापडला आहे. मध्य प्रदेशात दारुण पराभव झाला असला तरी मतांच्या टक्केवारीत मात्र फारसा बदल झालेला नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली मते आणि आताच्या मतांमध्ये केवळ अर्धा टक्क्यांचा फरक आहे. त्यामुळे मतदार टिकून राहिल्याने पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी अजूनही आशादायक स्थिती वाटत आहे.

महाराष्ट्रासह देशातील एखाद्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्ट्राइक रेटकडे बोट दाखविले जाते. तशीच स्थिती आता काँग्रेसचीही आहे. काँग्रेसचे नेतेही आता पराभवातून आशेचा किरण शोधत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट करत भाजप आणि काँग्रेसच्या मतांमधील फरकाचा आधार घेतला आहे. (Elections Result 2023)

Congress News
Karne Shirisha News: म्हशीवाल्या शिरीषाने निवडणूक गाजवली अन् BRS च्या उमेदवाराला धोबीपछाड, पण...

मध्य प्रदेशात भाजपने २३० पैकी १६३ जागा मिळवत काँग्रेसला धूळ चारली. काँग्रेसचा केवळ ६६ जागांवर विजय मिळवता आहे. तर दोन्ही पक्षांची मतांची टक्केवारी अनुक्रमे ४८.५५ व ४०.४० एवढी आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला १०९ तर काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये ५४ ने वाढ तर काँग्रेसच्या जागांमध्ये ४८ ने घट झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदारांची संख्या कमी झाली असली तरी काँग्रेसचे मतदार टिकून असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसला मागील निवडणुकीत मिळालेली मते ४०.४९ टक्के एवढी होती. या वेळी त्यामध्ये केवळ ०.४९ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, भाजपच्या मतांची टक्केवारी ७.५५ टक्क्यांनी वाढली आहे. भाजपसाठी हा मोठा विजय असला तरी काँग्रेसचे मतदार कायम राहिल्याने पक्षाची राज्यातील स्थिती अजूनही समाधानकारक असल्याचे चित्र आहे.

Congress News
Chhattisgarh Assembly Results 2023 : ‘ईडी’ने बिघडवला भूपेश बघेलांचा खेळ...दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले

राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजप आणि काँग्रेसमधील मतांमध्येही फारसे अंतर नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पुन्हा जोमाने काम करून भाजपला पराभूत करण्यासाठी आशादायक स्थिती असल्याचे माजी मंत्री जयराम रमेश यांना वाटते. त्यांनी याबाबत ट्विट करून म्हटले आहे की, तिन्ही राज्यांतील काँग्रेसची कामगिरी आणि आमच्या अपेक्षेपेक्षा खूप निराशाजनक आहे. पण मतांची टक्केवारी पाहता काँग्रेस भाजपच्या खूप मागे नसल्याचे दिसते. हे अंतर खूप कमी असल्याने पुन्हा उभारी घेण्यासाठी आशादायी आहे.

तिन्ही राज्यांतील भाजप व काँग्रेसच्या मतांची टक्केवारी

राज्य          भाजप          काँग्रेस

मध्य प्रदेश      ४८.५५         ४०.४०

राजस्थान        ४१.६९  ३९.५३

छत्तीसगड       ४६.२७  ४२.२३

(Edited By - Rajanand More)

Congress News
Mizoram Assembly Elections Results in Marathi: मिझोरमचे मुख्यमंत्री पिछाडीवर; तर उपमुख्यमंत्र्यांचा पराभव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com