India Alliance : महाराष्ट्राबाबत 'इंडिया आघाडी'च्या उद्याच्या बैठकीत होणार मोठा निर्णय!

India Alliance Meeting Seat Sharing : 'इंडिया आघाडी'च्या उद्या होणाऱ्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष...
INDIA Alliance
INDIA AllianceSarkarnama
Published on
Updated on

India Alliance Meeting Update :

लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट झालेल्या विरोधी पक्षनेत्यांची बैठक उद्या होत आहे. सकाळी साडेअकरा वाजता ही बैठक होईल. 'इंडिया आघाडी'च्या वरिष्ठ नेत्यांच्या या ऑनलाइन बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीशकुमार यांना समन्वयक केले जाऊ शकते, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना 'इंडिया आघाडी'चे अध्यक्ष बनवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

NitishKumar यांना 'इंडिया आघाडी'चे समन्वयक करण्याबाबत आघाडीतील बहुतेक घटकपक्षांची सहमती आहे. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची भूमिका मात्र कळलेली नाही, असे सूत्रांनी म्हटले.

INDIA Alliance
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी कधी जाहीर होणार? अलका लांबा यांनी सांगितला मुहूर्त

जागावाटपाचा तिढा सुटणार?

विरोधी पक्षांची उद्या होणारी बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. कारण या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती जागावाटपावर विविध राज्यांमध्ये चर्चा करते आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि समाजवादी पार्टी यांच्यासोबत आघाडीच्या समितीची बैठक झाली आहे. पण ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससोबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. तृणमूलने पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 48 जागांपैकी 2 जागा काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव काँग्रेसने नाकारला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आघाडीच्या आतापर्यंत किती बैठका?

विरोधी पक्षांच्या 'इंडिया आघाडी'ची आतापर्यंत चार वेळा बैठक झाली आहे. पहिली बैठक ही पाटणामध्ये 23 जूनला झाली होती. दुसरी बैठक बंगळुरूला 17-18 जुलैला झाली होती. तिसरी बैठक मुंबईत 31 ऑक्टोबर आणि १ सप्टेंबरला झाली होती. यानंतर चौथी बैठक ही डिसेंबरमध्ये झाली होती.

edited by sachin fulpagare

R...

INDIA Alliance
Bharat Nyay Yatra : काँग्रेसच्या न्याय यात्रेला भाजपकडून पहिला धक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com