India Alliance News : इंडिया आघाडीच्या सभेत राडा; खुर्च्या, लाठ्यांनी एकमेकांवर प्रहार

Lok sabha Election 2024 : इंडियाच्या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह आघाडीतील अनेक नेते उपस्थित राहिले आहेत. व्यासपीठावर केजरीवाल आणि सोरेन यांच्या खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत.
India Alliance
India AllianceSarkarnama

Ranchi News : लोकसभा निवडणुकीसाठी रांचीमध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या (India Alliance News) सभेत आज मोठा राडा झाला. दोन गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने गोंधळ उडाला होता. एकमेकांना लाठी आणि खुर्च्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत एकाचे डोके फुटले आहे. जवळपास दहा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. दरम्यान, हा गोंधळ उमेदवारीवरून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रांचीमध्ये आजच्या सभेत सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित झाले आहेत. काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी यांची तब्बेत ठीक नसल्याने ते उपस्थित राहिले नाहीत. इतर नेत्यांनी मात्र हजेरी लावली. व्यासपीठावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant soren) यांच्या नावाच्या खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. त्या खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आल्या.

India Alliance
Sunita Kejriwal News : सुनीता केजरीवालांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप; म्हणाल्या, "तुरुंगात मुख्यमंत्र्यांना..."

सभा सुरू असतानाच दोन गटांमध्ये वाद सुरू झाल्याचे समजते. राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेसचे हे कार्यकर्ते होते. झारखंडमधील चतरा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने के. एन. त्रिपाठी यांना दिलेल्या उमेदवारीला आरजेडीच्या कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. त्यावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आज भरसभेत भिडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सभेदरम्यान दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना खुर्च्यांनी मारहाण करण्यात आली. एका कार्यकर्त्याकडून लाठीचाही वापर करण्यात आला. मारहाणीमध्ये एकाच्या डोक्याला दुखापत झाल्याने रक्त वाहत होते. जवळपास दहा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर स्थानिक पदाधिकारी व पोलिसांनी हा गोंधळ आटोक्यात आणला.

दरम्यान, आजच्या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार संजय सिंह, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला यांच्यासह आघाडीतील अनेक नेते उपस्थित आहेत.

भाजपकडून या सभेची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. सभेमध्ये आचारसंहितेचा भंग करण्यात आला आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीकडून सर्वत्र बॅनर आणि पोस्टर लावण्यात आल्याचे भाजपने तक्रारीत म्हटले आहे.

India Alliance
Congress News : काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपच्याही पुढे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com