
India Vs Pakistan : मागील काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तामध्ये तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अमेरिकेने यशस्वी मध्यस्थी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. याबाबत स्वतः ट्रम्प यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मेस्त्री यांनीही या वृत्ताला दुजोरा दि ला.
डोनाल्ड ट्रम्प ट्विटमध्ये म्हणाले, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन, असे ते म्हणाले होते.
22 एप्रिल रोजीच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. या दुर्दैवी घटनेचा बदला घेण्यासाठी भारताने सुरुवातीच्या टप्प्यात सिंधू करार स्थगित केला. मुस्लीम पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला. आयात-निर्यात थांबवली, व्यापार बंद केला. एक मोठा दणका देत 'ऑपरेशन सिंदूर' आखून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले.
या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच राहिल्या. पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागातील शहरांवर ड्रोन हल्ले केले. सीमेवर गोळीबार, धार्मिक स्थळांवर हल्ले केले. याला या सगळ्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतानेही लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त केली. पाकिस्तानच्या पाच एअरबेसवर हल्ले चढवले. या सगळ्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने थेट अमेरिकेला विनंती केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती दर्शवण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.