
Impact on Indo-US Defense Relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयातशुल्क लादले आहे. त्याची अंमलबजावणीही आजपासून सुरू झाली. आता भारताने त्यावर जोरदार पलटवार करण्यास सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी भारताकडून एका मोठ्या डीलला रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे.
अमेरिकेकडून भारत एफ-35 फायटर जेट विमानांची खरेदी करणार होता. पण टेरिफ वॉरमुळे आता भारताने कठोर पवित्रा घेत अमेरिकेसोबत ही डील न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. याबाबत ब्लूमबर्गने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारत अमेरिकेकडून संरक्षण उपकरणे खरेदी करण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.
आपल्याला विमाने खरेदी करण्यास रस नसल्याचे भारताने अमेरिकेला कळविल्याचे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारताला एफ-35 ही विमाने विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर यासंबंधी करारावर चर्चा सुरू झाली होती.
अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, मोदी सरकार एफ-35 विमाने खरेदी करू इच्छित नाही. त्याऐवजी भारतातच संरक्षण उपकरणांचे उत्पादन करण्यावर सरकारला अधिक रस आहे. अर्थात भारताकडून हे पाऊल देशहितासाठी उचलले आहे. टॅरिफ धमकीशी त्याचा काही संबंध नाही. भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध बिघडू नयेत, यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, एफ-35 ची डील रद्द होण्याची शक्यता असली तरी भारताला द्विपक्षीय व्यापार कराराबाबत अजूनही अमेरिकेसोबत चर्चेची आशा आहे. पियूष गोयल यांनी याबाबत गुरूवारीच लोकसभेत संकेत दिले आहेत. चर्चेदरम्यान केवळ 10 ते 15 टक्के टॅरिफवर चर्चा सुरू होती, असेही गोयल यांनी म्हटले होते.
भारताकडून नैसर्गिक वायूची खरेदी आणि दूरसंचार उपकरण तसेच सोने आयात वाढविण्याबाबत विचार केला जात आहे. पण एफ-35 विमानांबाबत भारताला रस नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे अमेरिकेसाठी मोठा झटका मानला जात आहे. ही विमाने भारताने खरेदी केली असती तर अमेरिकेला मोठा आर्थिक फायदा झाला असता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.