
Understanding 'Persona Non Grata' in International Diplomacy : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर प्रचंड संतापलेल्या भारताने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी आपला परदेश दौरा आटोपता घेत, भारतात दाखल होताच तातडीने सीसीएसची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे पाकिस्तान भोवतीचा फास आवळला गेला आहे.
सीसीएस बैठक संपल्यानंतर या निर्णयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने पत्रकारपरिषद घेत माहिती दिली गेली. ज्यानंतर मध्यरात्रीच भारताने पाकिस्तानच्या राजदूतास बोलावून घेत त्यांना पर्सोना नॉन ग्राटा नोट बजावली. मात्र अनेकांना हे प्रश्न पडले आहेत की, पर्सोना नॉन ग्राटा नोट म्हणजे नेमकी काय भानगड आहे? याचा अर्थ काय आहे आणि ही बजावल्या गेल्यानंतर नेमका काय परिणाम होतो?
याच पार्श्वभूमीवर आपण याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. Persona Non Grata हे तीन लॅटीन शब्दांपासून बनले आहे. ज्याचा अर्थ अनावश्यक व्यक्ती किंवा अप्रिय व्यक्ती असा होतो. हा शब्द विशेषकरून राजकीय संदर्भांसाठी वापरला जातो. मात्र कालानुरुप हा शब्दप्रयोग सामान्य बोलाचालीत आणि मीडियामध्येही हळूहळू होताना दिसत आहे.
लॅटीन भाषा प्राचीन रोमची भाषा राहिली आहे आणि येथे आजही कायदा, धर्म, विज्ञान आणि राजकीय भागात अनेक शब्द आणि वाक्यांशांमध्ये वापरली जाते. Persona Non Grata देखील असा वाक्यांश आहे. जो आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकीय व्यवहाराचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
पर्सोना नॉन ग्राटा शब्द राजकीय प्रोटोकॉलचा हिस्सा आहे आणि यास १९६१च्या व्हिएन्ना कन्व्हेन्शन अंतर्गत अंतर्गत त्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. जेव्हा एखादा देश परदेशी राजदूत, दूतावास अधिकारी किंवा उच्च अधिकाऱ्यास अनुचित वर्तन, हेरगिरी किंवा राष्ट्रीय हिताच्याविरोधात काम केल्याबाबत दोषी मानतो, तेव्हा त्या व्यक्तीस पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले जाते. भारतानेही पाकिस्तानी उच्च अधिकाऱ्यास या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्सोना नॉन ग्राटा नोट बजावली आहे.
या परिणामा असा होतो की, संबंधित व्यक्तीस त्या देशातून निघावे लागते. त्याची राजकीय सवलत समाप्त होते. साधारणपणे ती व्यक्ती पुन्हा कधीच त्या देशात सेवा करू शकत नाही. हा एक राजकीय हकालपट्टीचा प्रकार आहे. जो सहसा युद्ध किंवा सशस्त्र संघर्षाचा अवलंब न करता देशांमधील मतभेद व्यक्त करण्याचे एक साधन आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.