RBI Dollar Sale : परकीय चलनसाठ्याची उधळपट्टी; दोन महिन्यात 66 अब्ज डॉलरची घट, रघुराम राजन यांचा सल्ला चर्चेत

India forex reserves fell by nearly $66 billion in two months $719.74 billion RBI sold dollars support rupee. Raghuram Rajan warning in focus : सप्टेंबरमध्ये विक्रमी 785 अब्ज डॉलरवर असलेला भारताचा परकीय चलनसाठा 719.74 अब्ज डॉलरवर घसरला; रुपयाची घसरण रोखण्यासाठी डॉलर विक्री सुरू असताना राजन यांनी दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार करण्याचा दिला होता सल्ला.
Raghuram Rajan
Raghuram RajanSarkarnama
Published on: 
Updated on: 

India Foreign Exchange Reserves : रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या परकीय चलन साठ्यात गेल्या दोन महिन्यात सुमारे 66 अब्ज डॉलरची घट झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला उचांकी पातळीवर असलेला चलनसाठ्यात काल 30 ऑक्टोबरपर्यंत सुमारे 65.96 अब्ज डॉलरवर घसरून तो, 719.748 अब्ज डॉलरवर आला आहे.

रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून डॉलरची विक्री होत आहे. याचवेळी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काही दिवसांपूर्वी रुपयाला आधार देण्यासाठी परकीय चलनसाठा उधळू नये, असा दिलेला सल्ला देखील चर्चेत आला आहे.

सप्टेंबरच्या महिन्याच्या सुरवातीला देशाकडे परकीय चलनसाठा 785.706 अब्ज डॉलरवर उचांकी पातळीवर होता. त्यात गेल्या दोन महिन्यात वेगाने ओहोटी सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या परकीय चलनसाठ्यात 1.26 अब्ज डॉलरची घट नोंदवली गेली आहे. यापूर्वीच्या आठवड्यात 5.01 अब्ज डॉलरची घट झाली होती.

अनिवासी भारतीयांच्या परकीय चलनातील ठेवी आकर्षित करण्यासाठी विशेष सलवतीच्या व्यवस्थेद्वारे बँकांनी (Bank) विक्रमी सुमारे 133 अब्ज डॉलर उभारण्यात यश आले होते. या ठेवींच्या माध्यमातून मिळालेल्या परकीय चलनाचा काही रुपयाला आधार देण्यासाठी वापरला जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Raghuram Rajan
Tata Sons row : राहुल गांधींनी मोदी-शाहांना घेरले, निर्मला सीतारमण यांनी थेट काँग्रेसचा इतिहास काढला! टाटा वादात नवा ट्विस्ट

सोन्याच्या साठ्याच्या मूल्यातही घट नोंदवली गेली आहे. 2.65 अब्ज डॉलरची घट होऊन ते 103.15 अब्ज डॉलरवर आली आहे. परकीय चलन मालमत्तेच्या डॉलरमधील मूल्यावर युरो, पौंड आणि येन सारख्या अन्य चलनांच्या विनिमय दरातील चढउतारांचाही परिणाम होत आहे.

Raghuram Rajan
Raghuram Rajan on Rupee Fall : रुपयाच्या घसरणीवर रघुराम राजन यांचा मोदी सरकारला सल्ला; RBI ला दिला महत्त्वाचा इशारा!

रुपयाची विशिष्ट पातळी टिकवून ठेवण्यासाठी, सुरू असलेल्या तात्पुरत्या उपाययोजनांचा अट्टाहासापेक्षा अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन हिताचा विचार होणे गरजेचे आहे, असा दिलेला रघुराम राजन यांचा सल्ला आता पुन्हा चर्चेत आला आहे.

वित्तीय तूट वाढून 7.14 लाख कोटींवर

केंद्र सरकारची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 7.14 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अर्थसंकल्पात निर्धारित वार्षिक लक्ष्याच्या तुलनेत ती 42.1 टक्के नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 36.5 टक्के होती. सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 4.3 टक्के म्हणजेच, 16.96 लाख कोटी रुपयांचे वित्तीय तुटीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.