
India Pakistan tensions : ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आता भारताचं पुढचं पाऊल काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. नवी दिल्लीतही वेगवान घडामोडी सुरू आहेत. पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, शिवाय, महत्त्वपूर्ण गाठीभेटी देखील होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाचही स्थायी सदस्यांनांना म्हणजेच अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी टेलिफोनवर चर्चा करत, भारताची बाजू मांडली.
याशिवाय सायंकाळी परराष्ट्र मंत्रालयाच्या साउथ ब्लॉक येथील कार्यालयात यूएनएससीच्या पाचही स्थायी सदस्यांसह नऊ अस्थायी सदस्यांच्या भारतीय राजदूतांना बोलावून ऑपरेश सिंदूरच्या मागील कारणांबाबत सविस्तरपणे माहिती दिली गेली. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि एनएसए डोवाल यांनी अनेक देशांमधील आपल्या समकक्षांशी चर्चा केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यास भारताकडून अखेर जबरदस्त प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे भारताने मध्यरात्री एअर स्ट्राइक करून उध्वस्त केले, या कारवाईला भारताने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे, तर जगभरातून भारताच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. मात्र भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी पिक्चर अभी बाकी है असं सांगून पाकिस्तानचं टेन्शन अधिकच वाढवलेलं आहे.
भारतीय सैन्याने लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांचे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अड्डे उध्वस्त केले आहेत. भारताने एकूण नऊ ठिकाणं लक्ष्य केली होती आणि ती पूर्णपणे नष्ट देखील केली आहेत.
(Edited by - Mayur Ratnapakhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.