
Rashid Alvi’s Statement: A Fresh Political Controversy : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेश सिंदूर’ राबवून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने धडाकेबाज कारवाई करून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळं उध्वस्त केली आहेत. भारताच्या या कारवाईचे सर्वस्तरातून सुरू आहे. विऱोधी पक्ष देखील भारतीय सैन्याचे अभिनंदन करत आहेत आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्य्यावर एकजुट दाखवण्यासाठी सरकारच्या पाठिशी असल्याचे सांगत आहेत.
एकीकडे देशभरातून भारतीय सैन्याच्या या धडाकेबाज कारवाईवर आनंद व समाधान व्यक्त होत असताना, आता दुसरीकडे काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना केंद्रातील मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे, त्यामुळे अल्वी यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याचीही शक्यता निर्माण होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’वर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत काँग्रेस नेते राशिद अल्वी म्हणाले, ‘’आपल्या सैन्याला जी जबाबदारी भारत सरकारने दिली होती. आपल्या सैन्याने ती पार पाडून दाखवली. मात्र पंतप्रधानांनी म्हटलं होतं, आम्ही दहशवाद्यांची उरलीसुरली जमीन नष्ट करू. पंतप्रधानांनी म्हटलं होतं आम्ही आकांना नाही सोडणार. अमित शहांनी म्हटलं होतं निवडून निवडून दहशतवाद्यांना ठार मारू.’’
तसेच ‘’आम्ही आपल्या सैन्याचे अभिनंद करतो आणि भारत सरकारला विचारू इच्छितो की, मसूद अजहरला मारलं गेलं का?, हाफिज सईद आता जिवंत तर नाही? ते आका ज्यांना मारण्याबाबत बोललं गेलं होतं आणि जे सातत्याने आपल्या देशात दहशत पसरवत होते. त्यांचा खात्मा झाला की नाही झाला? संपूर्ण भारत या प्रश्नांची उत्तरं भारत सरकारला नक्कीच विचारेल.’’ असं अल्वी म्हणाले.
याशिवाय ‘’भारत सरकारने म्हटलं होतं की, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचाही हात आहे. आयएसआयचा हात आहे. आम्हाची इच्छा होती की, आसिम मुनीरला बेड्या ठोकून पकडून आणलं जावं. पाकव्याप्त काश्मिरला परत घ्यायचं की नाही घ्यायचं, यापेक्षा चांगली संधी नाही मिळू शकत. आम्ही प्रतीक्षा करत आहोत की, पाकव्याप्त काश्मीर परत मिळवला जावा, पाकव्याप्त काश्मिराल परत मिळवायचं आहे आणि यापेक्षा दुसरी चांगली संधी मिळू शकत नाही. आम्ही वाट पाहत आहोत, की पाकिस्तानी सैन्याची कंबर तोडली जावी, तेव्हाच हा दहशतवाद संपेल.’’यत
तर ‘’यापेक्षा जास्त प्रत्युत्तर देणं आवश्यक आहे, हे कमीत कमी आहे. आपल्या सैन्याने तर ते केलं जे भारत सरकारने सांगितलं. जेवढं लक्ष्य त्यांना दिलं गेलं, जे काही त्यांना सांगितलं त्यांनी पूर्ण करून दाखवलं. परंतु पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो, की निवडून निवडून दहशतवादी मारले गेले का? पुन्हा तर पहलगाम होणार नाही? दरवेळी काही दिवसांनी काहीना काही घडतं. ही अशी संधी आहे, जेव्हा पंतप्रधानांनी जे काही म्हटलं होतं. आम्ही दहशतवाद्यांची उऱलीसुरली जमीन नष्ट करू. आम्ही त्यांच्या आकांचा खात्मा करू. जर असं झालंय तर खूप चांगलं आहे. आम्ही तर केवळ पंतप्रधानांना हेच विचारणार, की जे काही तुम्ही म्हणाला होता ते पूर्ण झालं का?’’ असा सवालही अल्वी यांनी केला.
याचबरोबर ‘’मला नाही वाटतं, आपल्या सैन्याला मोकळीक दिली गेली होती. जर आपल्या सैन्याला पूर्णपणे मोकळीक दिली गेली असती, तर केवळ स्ट्राइक नसता झाला, तर यापेक्षाही काहीतरी मोठं झालं असतं. जेवढं सरकारने सांगितलं, आपल्या सैन्याने करून दाखवलं. तसेच आम्हाला वाटतं की पहलगाम पुन्हा होवू नये, आम्हाला वाटतं की जे सरकार सांगत होतं, की पाकिस्तानच्या उभारणीची कंबर तोडायची आहे, पाकिस्तानच्या सैन्याची कंबर तोडायची आहे ती कंबर तोडली पाहिजे.’’ असंही अल्वी यांनी यावेळी सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.