Shashi Tharoor : केंद्राकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळात समावेश पण काँग्रेसने डावललं; शशी थरूर म्हणतात, "माझा अपमान..."

India’s Anti-Terror Stance : 'ऑपरेशन सिंदूर' राबवत भारताने आपली दहशतवाद्यांविरोधातील भूमिका स्पष्ट केली. हीच भूमिका आता भारत जगासमोर नेण्यासाठी केंद्र सरकार सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे. या शिष्टमंडळात विविध पक्षातील खासदारांचा समावेश करण्यात आला आहे.
Narendra Modi, Shashi Tharoor, Rahul Gandhi
Narendra Modi, Shashi Tharoor, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

India anti-terror operation : पहलगाम दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा भारताने जगासमोर आणला.

'ऑपरेशन सिंदूर' राबवत भारताने आपली दहशतवाद्यांविरोधातील भूमिका स्पष्ट केली. हीच भूमिका आता भारत जगासमोर नेण्यासाठी केंद्र सरकार सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे. या शिष्टमंडळात विविध पक्षातील खासदारांचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना देखील संधी देण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसला मात्र शशी थरूर यांचं नाव पसंत नसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण काँग्रेसने थरूर यांच्याऐवजी इतर चार खासदारांची नावे केंद्र सरकारकडे पाठवली आहेत.

Narendra Modi, Shashi Tharoor, Rahul Gandhi
Bangladesh Politics : बांग्लादेश विमानतळावर ‘शेख हसीना’ अटकेत; 2 वर्षांतच अभिनेत्रीला तुरुंगवारी

मात्र, तरीही केंद्राकडून मात्र शशी थरूर यांच्याच नावाला पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्राने संधी दिली तरी काँग्रेस थरूर यांना डावलत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून तुमचा अपमान केला जात आहे का? असा प्रश्न थरूर यांना विचारला असता, "माझा एवढ्या सहजपणे अपमान होऊ शकत नाही. मला माझी किंमत माहित आहे" असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना शशी थरूर म्हणाले, "केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मला माझ्या अनुभवावरून मला या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केलं. त्याला मी देखील लगेच होकार दिला. शिवाय यात मला कोणतंही राजकारण दिसत नाही. जेव्हा आपल्या राष्ट्राचा विषय असतो तेव्हा राजकारण महत्त्वाचं नसतं."

Narendra Modi, Shashi Tharoor, Rahul Gandhi
Saifullah Khalid : पाकिस्तानातच लष्कर-ए-तोयबाला मोठा झटका! भारतविरोधी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या दहशतवाद्याची गोळ्या झाडून हत्या

तर काँग्रेसने सुचवलेल्या नावांची मला माहिती नाही, हा पक्ष आणि केंद्र सरकारमधील विषय आहे. मात्र, जेव्हा मला किरेन रिजिजू यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता तेव्हाच मी आपल्या पक्षाला याबाबतची माहिती दिल्याचं थरूर यांनी स्पष्ट केलं.

शिष्टमंडळ नेमकं कशासाठी?

भारताची ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादा विरोधातील भूमिका जगाला सांगण्यासाठी भारताच्या खासदारांचे शिष्टमंडळ परदेशी दौऱ्यावर पाठवले जाणार आहे. यामध्ये सर्वपक्षांच्या खासदारांचा समावेश असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com