India and China Population : भारताने चीनला मागे टाकले; ठरला जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश

UN Report on Population : 'यूएन'च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या चीनपेक्षा ३० लाखांनी वाढली
World Population
World PopulationSarkarnama

India's Population : भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राने बुधवारी सकाळी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातील आकडेवारीनुसार भारत या वर्षाच्या मध्यापर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल. त्यावेळी भारताची लोकसंख्या चीनपेक्षा ३० लाख जास्त असण्याचा अंदाज वर्तविला आहे.

World Population
PCMC News : होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑ़़डिटची सूचना अंमलात आणली असती, तर पाच निष्पाप जीव गेले नसते..

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (यूएनएफपीए UNFPA) ने 'स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, २०२३' हा अहवाल जाहीर केला आहे. त्यातील माहितीनुसार चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी तर India भारताची १४२.८६ कोटी आहे. दरम्यान, लोकसंख्या तज्ज्ञांनी मागील यूएन डेटा वापरून भारत या महिन्यात चीनला मागे टाकेल असा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, बुधवारी दुपारपर्यंत संयुक्त राष्ट्राने आणखी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे.

World Population
Sanjay Rathod News : अन्न व औषध प्रशासनवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; मंत्री राठोडांची पहिली प्रतिकिया,म्हणाले...

'यूएनएफपीए'च्या नवीन अहवालातील आकडेवारीतून भारतात सर्वात जास्त तरुणांची संख्या असल्याचेही स्पष्ट झाले आहे. भारतातील २५ टक्के लोकसंख्या ०-१४ वयोगटातील आहे. तर १८ टक्के १० ते १९ वयोगटातील, २६ टक्के १० ते २४ वयोगटातील, ६८ टक्के १५ ते ६४ वयोगटातील आणि ७ टक्के ६५ वर्षांवरील लोकसंख्या आहे. दरम्यान, या वेगानुसार पुढील तीन दशकांपर्यंत भारताची लोकसंख्या १६५ कोटी होण्याचा अंदाजही या अहवालात वर्तविण्यात आला आहे.

World Population
Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीसांच्या कर्नाटकात सभा, आपल्या वक्तृत्वाची जादू दाखवणार?

या अहावालातून चीनची (China) लोकसंख्या गेल्या सहा दशकांत प्रथमच घटल्याचे दिसून आले आहे. यानंतरही चीनच्या लोकसंख्येमध्ये फक्त घट होईल, असा अंदाजही यावेळी वर्तविला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारताची वार्षिक लोकसंख्या २०११ पासून सरासरी १.२ टक्के वाढली आहे. तर २०११ पूर्वी हीच सरासरी १.७ टक्के होती.

जागाच्या एकूण क्षेत्रफळात चीनने ६.५ टक्के क्षेत्रफळ आहे. तर भारताने २.३ टक्के क्षेत्र व्यापले आहे. यूनच्या या अहावालानुसार भारताने क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुमारे तीनपट मोठ्या असलेल्या चीनला मागे टाकले आहे. लोकसंख्या वाढीमुळे 'यूएनएफपीए'तील भारताचे प्रतिनिधी आंद्रिया वोजनर यांनी भारताच्या सामान्य लोकांवर परिणाम होईल, असा निष्कर्ष काढला आहे. वोजनर यांनी सांगितले की, "या सर्वेक्षातील काही निष्कर्षानुसार सतत वाढणाऱ्या लोकसंख्येचा परिणाम भारतातील जनसामान्यांवर होणार आहे. तसेच याचे पडसाद अर्थव्यवस्थेवरही उमटण्याची शक्यता आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com