Pahalgam terror attack : काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचं सर्वात मोठं कोंबिंग ऑपरेशन; दहशतवाद्यांशी हात मिळवणी करणाऱ्या 446 हून अधिक लोकांना घेतलं ताब्यात

Indian Forces Raid Terrorists' Hideouts : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर एकीकडे भारत सरकारने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली घेत पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देशातून हाकलून देण्याचे आदेश दिले आहेत.
Border security India
Border security IndiaSarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर एकीकडे भारत सरकारने दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली घेत पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देशातून हाकलून देण्याचे आदेश दिले आहेत.

तर दुसरीकडे सुरक्षा दलांनी देखील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांविरोधात शोध मोहिम उघडली आहे. याच मोहिमे अंतर्गत सुरक्षा दलांनी आतापर्यंत 446 हून अधिक लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Border security India
Mohan Bhagwat Statement : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरसंघचालक भागवत यांचे मोठे विधान; चर्चांना उधाण!

पहलगामचा हल्ला भारतीयांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत या हल्लेखोरांना कायमची अद्दल घडवा अशी जनभावना निर्माण झाली आहे. अशातच भारतीय सैन्य दलाने दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करत त्यांच्या अड्ड्यांवर छापे मारले.

शिवाय दहशतवादी कृत्यांसाठी मदत करणाऱ्या शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून ही काश्मीरमधील मागील दोन दशकांतील मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांविरोधात सुरक्षा दलाने धडक मोहिम सुरू केली आहे.

Border security India
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्याप्रकरणी सर्वात मोठी अपडेट; केंद्रीय गृहमंत्रालयानं तपास 'एनआयए'कडे सोपवला ?

यासाठी शनिवारी श्रीनगरमधील विविध भागांमध्ये छापेमारी करण्यात आली. अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. या कारवाईत आतापर्यंत 446 हून अधिक लोकांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलं आहे. दहशतवाद्यांचं जाळं मुळापासू नष्ट करण्यासाठी सुरक्षा दलाने ही शोध मोहिम सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com