India Pakistan Tension : मोठी बातमी! पाकिस्तानसोबत तणाव अन् केंद्राचे राज्यांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिमहत्त्वाचे निर्देश

Home Ministry directive : जाणून घ्या, ७ मे रोजी नेमंक काय करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सांगितलं गेलं आहे.
Security personnel conducting a mock drill on government instructions amid India-Pakistan tension for public safety preparedness.
Security personnel conducting a mock drill on government instructions amid India-Pakistan tension for public safety preparedness. sarkarnama
Published on
Updated on

Central Government Issues Mock Drill Advisory : जम्मू-काश्मीरमधील पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, एवढंच नाहीतर सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक राज्यांना मॉक ड्रील करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना ७ मे रोजी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मॉक करण्यास सांगितले आहे. राज्यांना हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी मॉक ड्रीलचे निर्देश दिले गेले आहेत.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने ७ मे रोजी प्रभावी नागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रील करण्यास सांगितले आहे. यासोबतच आणखी काही महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यासही सांगितली आहेत. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे -

Security personnel conducting a mock drill on government instructions amid India-Pakistan tension for public safety preparedness.
Pakistan Cyber Attack on India : जित्याची खोड...! पाकिस्तानकडून आता भारताच्या डिफेन्स वेबसाइट्सवर सायबर हल्ला

१. हवाई हल्ल्याची चेतावणी देणाऱ्या सायरनला सक्रीय केले जावे

२. हल्ल्याच्या परिस्थितीत स्वत:चा बचाव करण्यासाठी नागिरकांनी आणि विद्यार्थ्यांना नागरी संरक्षणासाठी प्रशिक्षण दिले जावे  

३. ब्लॅक आउट उपायांसाठी तरतूद असावी, म्हणजेच आवश्यकता भासल्यास वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत केला जावा. जेणेकरून शत्रूला लक्ष्य दिसू नये.

४. महत्त्वपूर्ण संस्थांच्या सुरक्षेचं नियोजन करा

५. संकटातून नागरिकांची सुटका करण्याची योजना तयार ठेवा आणि त्याचा सराव करा.

Security personnel conducting a mock drill on government instructions amid India-Pakistan tension for public safety preparedness.
Milind Deora Criticizes Uddhav Thackeray : ‘पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा उद्धव ठाकरे..’ ; मिलिंद देवरांनी लगावला टोला!

पहलगाम दहतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरात नाचक्की सुरू असतानाही पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. एकीकडे सीमारेषेवर सतत शस्त्रसंधी उल्लंघन करत गोळीबार, घुसखोरीचे प्रयत्न, दहशतवाद्यांना पाठबळ देणे सुरू ठेवलेल्या पाकिस्तानने आता, भारताच्या डिफेन्स वेबसाइट्सवरही सायबर अ‍ॅटक केल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com