India Pakistan War : घरातच थांबा, दारांमध्ये, खिडक्यांजवळ उभं राहू नका; ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केले नवे आदेश

Punjab drone attack : भारत पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला असून आता दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करायला सुरूवात झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात अलर्ट जारी केला आहे. विविध शहरांमध्ये युद्ध काळात स्वत:चा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतचं प्रशिक्षण दिलं जात आहे.
Red alert Punjab
Red alert PunjabSarkrnama
Published on
Updated on

Punjab Drone Attack : भारत पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला असून आता दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करायला सुरूवात झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात अलर्ट जारी केला आहे.

विविध शहरांमध्ये युद्ध काळात स्वत:चा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतचं प्रशिक्षण दिलं जात आहे. अशातच आता पंजाबच्या फिरोजपूरमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत.

Red alert Punjab
India vs Pakistan : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्याच्या घरावर पाकिस्तानने डागला तोफगोळा, राजकुमार थापा यांच्यासह दोघांचा मृत्यू

तर अशाच प्रकारचे आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याने पंजाबमधील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांचा सर्वाधिक धोका पाकिस्तानला लागून असलेल्या राज्यांना आहे. याच पार्श्वभूमीवर राजस्थान आणि पंजाब सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे.

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी मंत्रिमंडळातील 10 सहकाऱ्यांची राज्यात काम करण्यासह सीमावर्ती भागात राहण्यासाठी नियुक्ती केली आहे. शिवाय या 10 जणांना लोकांच्या संपर्कात राहण्याचेही आदेश पंजाब सरकारने दिले आहेत.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी चंदीगड विमानतळाच्या परिसरातील संभाव्य हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी नागरिकांना घरातच राहण्याचा आणि खिडक्या किंवा दाराजवळ उभे राहणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Red alert Punjab
India Pakistan War : ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस', अर्थ वाचून हसू आवरनार नाही!

शिवाय गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. अमृतसरचे जिल्हा आयुक्तांनी शहरात रेड अलर्ट जारी केला. यावेळी त्यांनी सर्व नागरिकांनी घरातच रहा. खिडक्यांजवळ उभे राहू नका, असं आवाहन केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com