Home Ministry alert : पाकिस्तानसोबत युद्धजन्य परिस्थिती अन् केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पाठवले महत्वाचे पत्र!

Home Ministry issues alert to all states : जाणून घ्या, भारत आणि पाकिस्तानमधील अतिशय तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने नेमकं काय सांगितलं आहे.
A representative image showing the Indian Home Ministry issuing an official advisory to all states amid escalating tensions with Pakistan.
A representative image showing the Indian Home Ministry issuing an official advisory to all states amid escalating tensions with Pakistan. Sarkarnama
Published on
Updated on

Home Ministry's Nationwide Alert to States : सध्या पाकिस्तानसोबत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. काल रात्री पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर भारतानेही जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. शिवाय, आज पहाटेही पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र भारतीय सैन्याने उध्वस्त केले आहेत.

याशिवाय पाकिस्तान सीमेशी लगत असलेल्या चेकपोस्टवरूनही भीषण गोळीबार सुरू आहे. ज्यालाही भारतीय सैन्यदलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. एकूणच निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना एक अतिशय महत्त्वपूर्ण पत्र पाठवलं आहे.

A representative image showing the Indian Home Ministry issuing an official advisory to all states amid escalating tensions with Pakistan.
World Bank : ...आता जागतिक बँकेकडूनही पाकिस्तानला मोठा दणका!

एएनआय वृत्तसंस्थेनुसार या पत्रात केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव आणि प्रशासकांना कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे सांगितले आहे.

गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिव आणि जिल्हा प्रशासनास सांगितले आहे की, त्यांनी सर्व आवश्यक असलेल्या सर्व खबरदारीच्या उपाययोजनांची कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी नागरी संरक्षण नियमांतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्यास सांगितले आहे. तसेच युद्ध कालावधीत आवश्यक असणाऱ्या वस्तू जसे की, रसद इत्यादी खरेदी करण्यास सांगितले आहे, जेणेकरून गरजेच्या वेळी ते सर्वांना उपलब्ध करून देता येईल.

A representative image showing the Indian Home Ministry issuing an official advisory to all states amid escalating tensions with Pakistan.
Mohan Bhagwat Appeals : 'कोणत्याही षडयंत्राला यशस्वी होऊ देऊ नका…', भारत-पाकिस्तान तणावावर RSS प्रमुख मोहन भागवत काय म्हणाले?

दरम्यान, पाकिस्तानची सध्या चारहीबाजूंनी कोंडी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने पाकिस्तानला धक्के बसत आहेत. भारतासोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सिंधू जल करारस स्थगिती प्रकरणी जागतिक बँकेकडे मदतीसाठी याचना केली होती मात्र जागतिक बँकेकडूनही पाकिस्तानला मोठ दणका बसला आहे. जागतिक बँकेने म्हटले की, संघटना सिंधू जल करारात केवळ एक मध्यस्थ आहे आणि ते काहीच करू शकत नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com