
India Vs China : भारत पाकिस्तानमधील तणावानंतर आता अमेरिकेतली डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचा (DIA)अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये पाकिस्तानला भारत हा मोठा धोका वाट असून ते छोटे अणुहत्यारे तयार करत आहेत. मात्र, भारत हा पाकिस्तानला तेवढे मोठे संकट मानत नाही. पाकिस्तानाला आपण कधीही तोंड देऊ शकतो, अशी भारताची भूमिका आहे. भारत चीनला आपला नंबर एक शत्रू मानत असल्याचे देखील या अहवालत म्हटले आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सरकार संरक्षण क्षेत्रात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करेत आहे की जसे भारताला जागतिक स्तरावर एक शक्तिशाली देश म्हणून सादर करणे,चीनचा मुकाबला करणे, आणि भारतीय सैन्याला बळकट देणे.
चीन हा पाकिस्तान आणि उत्तर कोरियाला अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी मदत करत आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांकडे सुमारे 170 अण्वस्त्रे आहेत. आपल्या अणवस्त्रांचे प्रदर्शन करत पाकिस्तान आपण कसे शक्तिशाली आहेत, हे भारताला दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील अहवालात म्हटले आहे.
अहवालात म्हटले आहे की, चीनकडे 600 पेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. आणि 2030 पर्यंत ती संख्या एक हजारपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. यातील बहुतांश अण्वस्त्रे तात्काळ वापरासाठी सज्ज असतील.विशेष म्हणजे पाकिस्तान आपली अणुशक्ती वाढवत आहे. तो आपले अण्वस्त्रे आणि ती नियंत्रित करण्याची यंत्रणा सुरक्षित ठेवत आहे. पाकिस्तान विनाशकारी शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी आवश्यक असलेली सामग्री परदेशी पुरवठादारांकडून खरेदी करत आहे, असे देखील अहवालात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.