India Today-C Voter Survey : देशात आठव्या स्थानी; मात्र, महाराष्ट्राच्या जनतेची पसंती मुख्यमंत्री शिंदेंना मिळेना!

देशातील पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांंमध्ये एकनाथ शिंदे यांनी स्थान मिळविले आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मदतीने महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्यमंत्रीपदी (Chief Minister) विराजमान झाले आहेत. त्यांना सत्तेवर येऊन येत्या ३० जानेवारी रोजी सात महिने पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे-सी व्होटर संस्थेने केलेल्या सर्व्हेत देशातील पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांंमध्ये एकनाथ शिंदे यांनी स्थान मिळविले आहे. देशातील मुख्यमंत्र्यांमध्ये ते आठव्या स्थानी आहेत. मात्र, स्वतःच्या गृहराज्यात म्हणजे महाराष्ट्रात शिंदे पाहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकलेले नाहीत. (India Today-C Voter Survey Eknath Shinde among the top ten Chief Ministers of the country)

शिवसेनेत बंड करून चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडणारे एकनाथ शिंदे यांना भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. वास्तविक भाजपचे राज्यात १०६ आमदार असतानाही भाजपने भविष्याचा विचार करून मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदेंच्या गळ्यात घातली आहे. मात्र, भाजपच्या अपेक्षा किती पूर्ण झाल्या आहेत, हे आगामी निवडणुकीतच दिसून येईल. मात्र, इंडिया टुडे-सी व्होटर संस्थेने केलेल्या ‘मूड ऑफ न नेशन’ सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे यांनी पहिल्या दहामध्ये म्हणजे आठवे स्थान मिळविले आहे.

Eknath Shinde
Congress On BJP :‘भाजपच्या माजी मंत्र्याची प्रतिमत सहा हजार वाटण्याची तयारी’ : काँग्रेसची नड्डांसह चौघांविरोधात पोलिसांत तक्रार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २.२ टक्क्यांसह आठव्या स्थानी आहेत. गृहराज्यात कोण सर्वाधिक लोकप्रिय आहे, याचा सर्व्हे करण्यात आला त्यामध्ये मात्र एकनाथ शिंदे हे पहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकलेले नाहीत.

Eknath Shinde
Nagar Congress Committee : नाना पटोलेंचा बाळासाहेब थोरातांना दे धक्का : नगरची अख्खी जिल्हा काँग्रेस कमिटीच बरखास्त

इंडिया डुटे-सी वोटरच्या सर्व्हेनुसार भारतातील सर्वाधिक पहिले दहा लोकप्रिय मुख्यमंत्री, राज्य, पक्ष आणि देशभरातील लोकांची पसंती पुढीलप्रमाणे

१) योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश, भाजप) : ३९ टक्के लोकांची पसंती

२) अरविंद केजरीवाल (दिल्ली, आप) : १६ टक्के लोकांची पसंती

३) ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल, तृणमूल काँग्रेस) : ७ टक्के पसंती

४) एम. के. स्टॅलिन (तामिळनाडू, द्रमूक) : ५ टक्के पसंती

५) नवीन पटनायक (ओडिशा, बीजेडी) : ३ टक्के पसंती

६) हेमंत बिसवा सरमा (आसाम, भाजप) ३ टक्के पसंती

७) शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश भाजप) : २.४ टक्के पसंती

८) एकनाथ शिंदे (महाराष्ट्र, बाळासाहेबांची शिवसेना) : २.२ टक्के पसंती

९) वाय. एस. जगन मोहन रेड्डी (आंध्र प्रदेश, वासएसआर काँग्रेस) : १.६ टक्के पसंती

१०) भूपेश बघेल (छत्तीसगड, काँग्रेस) : १. ६ टक्के पसंती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com