New Delhi Political News : देशात भाजपच्या विरोधात लढण्यासाठी देशभरातील भाजपविरोधी पक्षांनी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्ल्युसिव्ह अलायन्स' अर्थात 'INDIA' आघाडी स्थापन केली. देशातील आगामी लोकसभा निवडणुका एकत्रितरित्या लढवण्यासाठी आणि भाजपला शह देण्यासाठी भाजपविरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीमुळे भाजप आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष संपूर्ण देशाने पाहिला.
त्याचवेळी 'इंडिया' विरुद्ध 'भारत' असा वादही निर्माण झाला. 'इंडिया' हे नावच काढून टाकण्यासाठी भाजपने आग्रह धरला. यावरून राजकारणही चांगलेच तापले होते. हा वाद काहीसा मागे पडला असे वाटत असतानाच आता केंद्र सरकारने या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यामुळे यावरून राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
याचे कारण म्हणजे, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग' अर्थात 'NCERT'च्या पॅनेलने आपल्या पुस्तकांमध्ये 'INDIA' ऐवजी 'भारत' या नावाचा उल्लेख करण्यात यावा, यासाठी प्रस्ताव मांडला आहे. इतकेच नव्हे तर या पॅनेलच्या प्रस्तावाला मान्यही देण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. 'हा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी मांडण्यात आला होता आणि आता तो स्वीकारण्यात आला असल्याची माहिती पॅनेलच्या सदस्य असलेले सी. आय. आयझॅक यांनी दिली आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, NCERT च्या पॅनेलचे अध्यक्ष सी. आय. आयझॅक यांच्या पॅनेलने, अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये 'इंडिया' हा शब्द बदलून 'भारत' असा शब्द वापरण्याची शिफारस केली होती. तसेच, पाठ्यपुस्तकांमध्ये 'प्राचीन इतिहास' याऐवजी 'शास्त्रीय इतिहास' आणि सर्व विषयांच्या अभ्यासक्रमात 'भारतीय ज्ञान प्रणाली' (IKS) या नावाचा वापर करावा, अशीही शिफारस केली होती.
त्याचबरोबर,आतापर्यंतच्या या अभ्यासक्रमात हिंदू राजांच्या पराभवाचे चित्रण कऱण्यात आले आहे. आतापर्यंच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू राजांचा मुघलांवरील विजयाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे यापुढील पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू राजांच्या विजयाचा उल्लेख असलेला अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात यावा, अशीही शिफारस आयझॅक यांनी केला होती. (INDIA VS Bharat)
सीआय आयझॅक हे इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च (ICHR) चे सदस्य आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत NCERT आपल्या अभ्यासक्रमात बदल करत आहे. या १९ सदस्यीय समितीमध्ये आयसीएचआरचे अध्यक्ष राघवेंद्र तंवर, जेएनयूच्या प्राध्यापिका वंदना मिश्रा, डेक्कन कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलगुरू वसंत शिंदे आणि हरियाणाच्या सरकारी शाळेत समाजशास्त्र शिकवणाऱ्या ममता यादव यांचा समावेश आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.