India Pakistan ceasefire violation : शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी तिन्ही सैन्यदलाला स्वातंत्र्य; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा (VIDEO)

Indian Foreign Ministry Secretary Vikram Misri issued a stern warning to Pakistan during a press briefing following a recent ceasefire violation : शस्त्रसंधींच उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 Ministry Secretary Vikram Misri
Ministry Secretary Vikram Misri Sarkarnama
Published on
Updated on

Vikram Misri press conference : भारताबरोबर युद्धबंदीची अवघ्या तीन तासांत उल्लंघन करत पाकिस्ताने पुन्हा भारताविरोधी कुरापती सुरू ठेवल्या आहेत. पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार, ड्रोन हल्ले चालूच ठेवले आहेत. भारताने प्रत्युत्तरात हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले.

पाकिस्तानच्या या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर भारताच्या परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत, पाकिस्तनाच्या प्रत्येक हालचालीवर भारताची करडी नजर आहे, पाकिस्तानने कुरापती थांबवल्या नाही तर, आम्ही आमच्या तिन्ही सैन्यदलांना प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे, असं सुनावलं आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. युद्धस्थिती निर्माण झाली आहे. यातच आज दुपारानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत (India) -पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा करार करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तशी त्यांच्या समाज माध्यमांवरून घोषणा केली. परंतु अवघ्या तीन तासात पाकिस्तानने युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानने जम्मू-काश्मीर या सीमालगत भागात ड्रोन हल्ले, गोळीबार, तोफगोळ्यांचा मारा सुरू केला.

 Ministry Secretary Vikram Misri
India Pakistan prisoners : 'अमेरिकेला बाप बनू देऊ नका!' बिहारचा 'हा' खासदार भडकला

पाकिस्तानाच्या (Pakistan) या कुरापतीला भारतीय लष्करानं सडेतोड उत्तर दिलं आहे. परंतु पाकिस्तानच्या या कुरापतीवरून भारत चांगलाच संतापला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आज दिवसभरातील तिसरी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणार, अशा कडक शब्दात सुनावलं.

 Ministry Secretary Vikram Misri
Asaduddin Owaisi IMF Pakistan : 'IMF'चे पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज म्हणजे, दहशतवादी संघटनेला पोसण्यासारखे; असदुद्दीन ओवैसी संतापले

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला पाकिस्तान जबाबदार आहे. भारताने या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर दिले असून, पाकिस्तानने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे".

भारतीय सैन्य सतर्क असून, कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर भारताची करडी नजर आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाकिस्तानने आपले आक्रमक हल्ले थांबवावेत. अन्यथा आम्ही आमच्या तिन्ही सैन्यदलांना प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहेत, असे विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com