Baramati BJP News: बारामतीबाबत पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काम करु; भाजपने स्पष्ट केली भूमिका

Vasudev Kale News: अजित पवार यांच्या भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्यामुळे प्रारंभी काहीसे संभ्रमाचे वातावरण होते.
Vasudev Kale News
Vasudev Kale NewsSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीत (Baramati) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा उमेदवार असेल तर भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधात निश्चित उमेदवार उभा करेल. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उमेदवाराबाबत काही निर्णय घेतला तर पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार काम करु, अशी माहिती भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.

अजित पवार यांच्या भाजप (BJP)-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्यामुळे प्रारंभी काहीसे संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता महायुतीत तिन्ही पक्ष सोबत काम करणार, असून स्थानिक पातळीवरही पक्षाच्या निर्देशानुसार काम करु, असे काळे यांनी स्पष्ट केले.

Vasudev Kale News
Chitra Wagh News : 'कोविड घोटाळ्यात कंत्राटे कोणी ओरबाडली; उद्धवजी... यावर कधी बोलाल?' चित्रा वाघांनी डिवचलं

काळे म्हणाले, इलेक्टीव्ह मेरीट हा निकष भाजपने गांभीर्याने घेतला असून आगामी सर्वच निवडणुकीत हा मुद्दा महत्वाचा असेल. याच अनुषंगाने लोकसभा प्रवास या अभियानाअंतर्गत दर पंधरा दिवसांनी बारामती विधानसभा व लोकसभा मतदारसंघात एक मंत्री कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार आहे. स्थानिक पातळीवरच कार्यकर्त्यांचे प्रश्न संपले पाहिजे, 'शासन आपल्या दारी' प्रमाणे मंत्री आपल्या दारी या नुसार स्थानिक स्तरावरच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होईल.

देशातील ज्या 144 लोकसभा मतदारसंघात भाजपला आजवर यश मिळालेले नाही, त्यात बारामतीचा समावेश आहे. बारामतीवर भाजपकडून लक्ष केंद्रीत करणे स्वाभाविक आहे. नेतृत्वाने बारामतीवर फोकस केलेला आहे. बारामती हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे, येथेच नाही तर कोठेही अगोदर उमेदवार जाहीर करण्याची भाजपची प्रथा नाही. योग्य वेळी उमेदवार दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Vasudev Kale News
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे 'इंडिया'च्या मोहिमेला धार चढवणार; मुंबईत मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक

सत्ता येऊनही भाजपच्या कार्यकर्त्यांना फारशी संधी मिळालीच नाही, या बाबत विचारता भाजपमध्ये येणारा कार्यकर्ता हा पदाच्या अपेक्षेने येत नसतो, विचारांवर आधारीत भाजपचे काम चालते, असे ते म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com