Narendra Modi On INDIA Alliance : इंडियन मुजाहिद्दीन - ईस्ट इंडिया कंपनीच्या नावातही 'INDIA'; विरोधकांवर पंतप्रधानांची बोचरी टीका!

Narendra Modi On INDIA Alliance : "नावात इंडिया किंवा देशाचं नाव घेऊन कोणीही भारतीय होत नाही," मोदींचा हल्लाबोल..
Narendra Modi On INDIA Alliance
Narendra Modi On INDIA AllianceSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भाजप विरोधी पक्षांनी आपल्या राजकीय आघाडीचं नाव यूपीए हे पूर्वीचं नाव बदलून 'इंडिया' (इंडियन नॅशनल डेव्हलोपमेन्टल इनक्लुजिव्ह अलायन्स) असे केले आहे. या आघाडीच्या संक्षिप्त रूपाला 'इंडिया' असे देशाचे नाव प्राप्त झाले. यामुळे भाजपकडून विरोधकांच्या आघाडीवर निशाणा साधला जात आहे. यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विरोधकांच्या या आघाडीवर बोचरी टीका केली आहे. (Latest Marathi News)

Narendra Modi On INDIA Alliance
Nagpur News : मोदी सरकारने दोन्ही आदिवासी समाजांत भांडणे लावून मणिपूर जाळले, पटोलेंचा घणाघात !

भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मंगळवार (ता.२५) रोजी मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मागील ४ दिवसांपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरू असलेल्या गदारोळावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'असा दिशाहीन विरोध मी आजपर्यंत पाहिला नाही. हे लोक गोंधळलेले आहेत आणि त्यांना नेमके काय करायचे ते ठरवू शकत नाहीत. विरोधक विखुरलेले आणि हतबल झाले आहेत."

मोदी पुढे म्हणाले, "नावात इंडिया किंवा देशाचं नाव घेऊन कोणीही भारतीय होत नाही, इंडियन मुजाहिदीन आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या या संघटनांच्या नावातही इंडियाचा उल्लेख होता." अशा शब्दात मोदींनी विरोधी आघाडीवर निशाणा साधला.

Narendra Modi On INDIA Alliance
Protest Against Manipur incident : `मोदी सरकार चुप्पी छोडो, भारत जोडो`, मणिपूर घटनेविरोधात संताप..

दरम्यान, मणिपूरसंदर्भात चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया सुप्रिया श्रीनाते यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. 'मणिपूरमधील एवढ्या गंभीर घटनांनंतरही पंतप्रधान ३६ सेकंदच बोलले, सरकारला मणिपूरच्या परिस्थितींचं गांभीर्य नाही, असे श्रीनाते म्हणाल्या. (Prime Minister's Narendra Modi criticism of the opposition)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com