
जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसची वाढती लोकप्रियता पाहता. पॅरिसमध्ये AI एआय' शिखर परिषद सुरू होत आहे. या दोन दिवसांच्या शिखर परिषदेत, जगभरातील नेते एआयचा वाढता वापर, क्षमता आणि चिंता यावर चर्चा होणार आहे. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यानंतर ते थेट अमेरिकेला रवाना होतील. पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान पॅरिस दौऱ्यावर असणार आहेत.
पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला पॅरिसला पोहोचतील आणि संध्याकाळी एलिसी पॅलेसमध्ये डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचे सीईओ देखील उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारीला एआय अॅक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवतील.
गेल्या आठवड्यात, पंतप्रधान मोदींच्या पॅरिस भेटीबाबत, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले होते की, या शिखर परिषदेत आम्हाला अनेक घोषणांची अपेक्षा आहे. आम्हाला अशा एआय अॅप्लिकेशन्समध्ये रस आहे जे वापरण्यास सुरक्षित आणि विश्वासार्ह आहेत. या दरम्यान, पंतप्रधान मोदी भारत-फ्रान्स सीईओ फोरमलाही संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारीला अमेरिकेला रवाना होणार आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसेच अनेक व्यावसायिक, नेते आणि भारतीयांचीही भेट घेणार आहेत.
आजकाल चिनी एआय चॅटबॉट डीपसीक चर्चेचा विषय बनला आहे. ते लाँच होताच, अमेरिकन शेअर बाजार कोसळला, त्यानंतर जगभरातील लाखो लोकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. यासोबतच, डीपसीकचे चीन सरकारशी संबंध असल्याचे आरोपही होऊ लागले. सध्या अमेरिका, तैवान आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी डीपसीकच्या वापरावर बंदी घातली आहे. त्याच वेळी, भारत सरकारने वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना डीपसीक वापरू नये असा सल्लाही दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.