
Kolhapur News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप सदस्य नोंदणी अभियान राबवत आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ऑपरेश टायगर आणि ऑपरेशन शिवधनुष्य कोकणात रावत आहे. यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत काम करत असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अशातच आता ठाकरे गटासह शरद पवार गटाला गळती लागली आहे. सांगली जिल्ह्यात आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून जिल्हाध्यक्षानेच पक्षाला राम राम ठोकला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या जिल्ह्यातच राष्ट्रवादीला झटका बसला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. पण त्याआधी काही ठिकाणी नेते, माजी आमदार किंवा कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ दिसत आहे. सध्या कोकणात महायुतीत अशी रस्सी खेच पाहायला मिळत असून येथे ठाकरे गटाचे अनेक नेते पक्षाला राम राम ठोकून दुसर्या पक्षात प्रवेश करत आहेत. यामुळे ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असून असे धक्के आता शरद पवार गटालाही बसण्यास सुरूवात झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवक जिल्हाध्यक्षाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची साथ सोडली आहे. विराज नाईक यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. विराज नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे सुपुत्र आहेत. तर त्यांच्या राजीनामा हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना धक्का मानला जात आहे. विराज नाईक हे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
दोन दिवसांपूर्वीच विराज नाईक यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एसटी प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले होते. पण आता अचानक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क काढले जात आहेत. तर मुलाने अशा पद्धतीने तडकाफडकी राजीनामा दिल्याने माजी आमदार मानसिंगराव नाईक हे देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाला अनेक पदाधिकारी राम राम ठोकत असून भाजपसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष यांने आपला पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.