Inflation : सामान्यांना दिलासा ! किरकोळ महागाई दरात घसरण कायम

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो दर ०.३५ टक्क्यांनी वाढवून ६.२५ टक्क्यांवर नेला होता.
India Inflation latest news Update
India Inflation latest news Update

India Inflation latest news Update : जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आकड्यांच्या दुनियेतून दिलासादायक बातमी आली आहे. मागच्या महिन्यात, नोव्हेंबरमध्ये देशातील किरकोळ चलनवाढीचा दर गेल्या ११ महिन्यतील नीचांकी म्हणजे ५.८८ टक्क्यांवर आला असल्याचे आज जाहीर करण्यात आले.

किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारी २०२२ पासून रिझर्व बँकेच्या ६ टक्क्यांच्या मर्यादेच्या वर राहिला होता. ६ टक्के ही चलनवाढ किंवा महागाईची सर्वसामान्य किंवा सहनशील पातळी मानली जाते. मागच्या वर्षी याच काळात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये देशातील किरकोळ चलनवाढीचा दर ५.६६ टक्के होता. मात्र २०२२ मध्ये महागाईचा आलेख सातत्याने वाढत गेला. दूध, भाजीपाला, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, अन्नधान्य या सर्व पदार्थांच्या दारामध्ये सातत्याने वाढ होत गेली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात रेपो दर ०.३५ टक्क्यांनी वाढवून ६.२५ टक्क्यांवर नेला होता.

India Inflation latest news Update
'' माजी मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असता तर...''; भाजप नेत्याचा उध्दव ठाकरेंना टोला

नोव्हेंबर महिन्यात मुख्यतः अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ६ टक्क्यांच्या खाली टक्क्यांच्या खाली आला. नॅशनल स्टॅटिस्टिकल कार्यालयाने (एनएसओ) ने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मानकापेक्षा खाली आलेली किरकोळ चलनवाढीची ११ महिन्यांतील ही पहिलीच वेळ आहे. किरकोळ चलनवाढीचा दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची जबाबदारी रिझर्व बॅंकेकडे असते. ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई ऑक्टोबर 2022 मध्ये ६.७७ टक्के आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ४.९१ टक्के होती. एनएसओ च्या आकडेवारीनुसार अन्नधान्य चलनवाढ मागील महिन्यात ७.०१ टक्क्यांवरून ४.६७ टक्क्यांपर्यंत घटली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com