'' माजी मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असता तर...''; भाजप नेत्याचा उध्दव ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray : ... तरीही काही मंडळींनी मोठे मन केले नाही.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देणे हा छोटासा विषय होता. एखाद्याने मनाचा मोठेपणा दाखविला असता तर भूमिपुत्रांसह आगरी समाजाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास देण्यासाठी संघर्ष करण्याची गरज भासली नसती असा टोला सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण (Minister Ravindra Chavan) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

डोंबिवली पूर्वेतील ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडासंकुलात आगरी युथ फोरमच्या वतीने 18 व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी महोत्सवाचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपाचे आमदार गणपत गायकवाड, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, दशरथ पाटील, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, आचार्य प्रल्हाद शास्त्री, ह.भ.प. जयेश पाटील, जर्नादन जिताडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. फोरमच्या कणसा या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Uddhav Thackeray
Mahavikas Aaghadi: 'महाविराट' मोर्चाबाबत मोठी अपडेट! पोलिसांनी आघाडीच्या नेत्यांना केली 'ही' विनंती

यावेळी आपल्या भाषणात नवी मुंबई विमानतळ नामंतरणाचा विषय निघताच माजी मुख्यमंत्र्यांना यावरून टोला लगावला. आगरी युथ फोरमच्या वतीने सरकार आता बदलले आहे, आता नवी मुंबई विमानतळ नामांतरणाचा ठराव दिल्ली दरबारी मांडा त्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी मंत्री चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.

Uddhav Thackeray
काँग्रेसला अंधश्रद्धेची लागण; शुक्राचा अस्त झाला...म्हणून पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये होम-हवन

यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले, नवी मुंबईत विमानतळ प्रस्तावित होताच, येथील शेतकऱ्यांना साडे बावीस टक्के लाभ आणि अन्य सुविधा देण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नवी मुंबई क्षेत्रात लोकनेते दि. बा. पाटील यांचे अतुलनीय काम आहे. या भागातील विमानतळाला त्यांचेच नाव देणे योग्य होते. तरीही काही मंडळींनी मोठे मन केले नाही. मोठे मन केले असते तर नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा विषय चिघळला नसता. भूमिपुत्र तसेच समाजास यासाठी संघर्षही करण्याची गरज भासली नसती असे बोलून मंत्री चव्हाण यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टिका केली.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या समाजावर अन्याय होणार नाही अशा पध्दतीने धाडसी आणि धोरणात्मक निर्णय घेतले. या निर्णयात थोडी चूक झाली असती तर ओबीसी समाजातील मुलांना नोकरीमध्ये तसेच लोकप्रतिनिधींना महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष सारख्या पदापासून दूर राहावे लागले असते. हे सगळे जोखड आता दूर करण्यात आले आहे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

ठाणे, रायगड, मुंबई जिल्ह्यात आगरी समाज मोठ्या संख्येने आहे. येथील समाजाने जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्पांसाठी आपली जमिन देत मोठे योगदान दिले आहे. येथील आगरी समाजाचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले सामाजिक, विकासाभिमुख प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे तसेच, या समाजाला न्याय देण्याचे महत्वपूर्ण काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे,

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com