इम्रान खान यांना अटक होणार; गृहमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची रविवारी सर्वात मोठी परीक्षा होणार आहे. थोड्याच वेळात विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे.
Imran Khan
Imran KhanSarkarnama

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची रविवारी सर्वात मोठी परीक्षा होणार आहे. मागील चार वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर त्यांना आता अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी काही मिनिटांच कालावधी उरलेला असताना गृहमंत्र्यांनी केलेल्या दाव्यामुळे पाकिस्तानात (Pakistan) खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांना अटक केली जाऊ सकते, असं ते म्हणाले आहेत. (Imran Khan News Update)

पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्याविरोधात संसदेत (Parliament) अविश्वास ठराव मांडला आहे. त्यावर रविवारी मतदान होणार आहे. पण परीक्षेला सामोरे जाताना त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. विरोधकांनी काही तास आधीच संसदेच्या अध्यक्षांविरोधातही अविश्वास ठराव मांडला आहे. त्यावर सुमारे 100 हून अधिक खासदारांनी सह्या केल्या आहेत. त्यातच गृहमंत्री शेख रशीद यांनी पंतप्रधानांच्या अटकेची भीती व्यक्त केली आहे.

Imran Khan
पवारांचे नाव घेतले की चर्चा होतेच..हे डोक्यात ठेवूनच काही जण भाषण करतात, राज यांना टोला

शेख रशीद म्हणाले, मला वाटते की, इम्रान खान यांना ते अटक करू शकतात. ते इम्रान खान यांना सहन करू शकत नाहीत. जवळपास 155 खासदार राजीनामा देऊ शकात. हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे. या स्थितीत निवडणुकीच एकमात्र पर्याय आहे. पाकिस्तानी यंत्रणांनी याची दखल घेत निवडणुकांची तयारी करायला हवी, असंही शेख रशीद यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मध्यावधी निवडणुका होणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, पीएमएलएन पक्षाच्या नेत्या मरियम औरंगजेब यांनी विरोधकांना 174 खासदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. मतदानाआधी विरोधकांच्या बैठकीत 177 खासदारांनी हजेरी लावल्याचा दावाही केला जात आहे. त्यामुळे इम्रान खान यांची सत्ता जाऊ शकते. सत्ता मिळवण्यासाठी त्यांना 172 चा आकडा गाठवा लागणार आहे. त्यामुळे इम्रान खान दमछाक होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. इम्रान खान यांनी सत्ता टिकवण्यासाठी घोडेबाजार सुरू केला आहे. मित्रपक्षांना खूश करण्यासाठी विविध पदं दिली जात आहेत. तर विरोधी खासदारांना गळाला लावण्याचाही प्रयत्न केला जात आहे. पण त्यांचे हे प्रयत्न सध्यातरी सफल होताना दिसत नाहीत. कारण विश्वासदर्शक ठराव मांडताना त्याबाजूने 161 खासदांनी मतदान केलं आहे. त्यामुळे हा प्रस्ताव चर्चेला आला आहे.

Imran Khan
शरद पवारांनी दिलं राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले…

सत्ताधारी आघाडीतील काही खासदारांनीही नाराजी व्यक्त करत इम्रान खान यांच्याविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. इम्रान खान सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाहजान बुग्ती (Shahjan Bugti) यांनी राजीनामा दिला आहे. बुग्ती हे बलूचिस्तानमधील जम्हूरी वतन पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी रविवारी पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) जरदारी यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने अन्य विरोधी पक्षांतील नेत्यांकडे खान यांच्या विरोधातली प्रस्तावावर समर्थन मागितले होते.

Imran Khan
UPAच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवाराचं मोठं विधान, म्हणाले, 'नेतृत्व करण्याची जबाबदारी..'

असं असेल गणित...

संसदेतील एकूण खासदार - 342

विरोधी पक्षांची ताकद -

पीएमएलएन - 84

पीपीपी - 56

एएनपी - 1

एमएमए - 14

बीएनपी - 4

बीएपी - 4

एमक्यूएम - 6

इतर - 5

एकूण - 174

इम्रान खान सरकारकडील खासदार -

पीटीआय - 155

पीएमएलक्यू - 4

बीएपी - 1

जीडीए - 3

एमएमएल - 1

इतर - 4

एकूण - 168

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com