IPS Anjana Krishna News : अजित पवारांसोबतच्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल होताच अंजना कृष्णा यांच्या घरी फोनवर फोन सुरू...

IPS Anjana Krishna’s Stand Against Illegal Mining : अंजना कृष्णा या त्यांच्या गावासह परिसरातील पहिल्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या आई जिल्हा न्यायालयात लिपीक आहेत. जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या मुलांमध्येही अंजना या पहिल्या अधिकारी ठरल्या आहेत.
"IPS Anjana Krishna’s viral video confronting Ajit Pawar sparks political and public reactions."
"IPS Anjana Krishna’s viral video confronting Ajit Pawar sparks political and public reactions."Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar controversy : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गाव सध्या देशपातळीवर पोहचले आहे. त्याला कारणीभूत ठरल्या आहेत आयपीएस अंजना कृष्णा. गावात सुरू असलेले कथित अवैध मुरूम उत्खनन रोखण्यासाठी त्या गावात गेल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचा फोनवर संवाद झाला. याच संवादाचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर देशभरात आयपीएस अंजना कृष्णा प्रकाशझोतात आल्या. आता त्यांच्या वडिलांनी अवैध उत्खननाबाबत आपबीती सांगितली आहे.

आयपीएस अंजना कृष्णा या प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. घडलेल्या घटनेबद्दल त्यांचे वडील व्ही. आर. विजू यांनी मीडियाशी बोलताना अवैध उत्खननाबद्दलही भाष्य केले आहे. ते म्हणाले, उत्खननाचा मुद्दा तिच्यासाठी नवीन नाही. मुक्कून्नीमला येथे अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होते होते. आमच्या घरापासून ते केवळ एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. ते पाहतच अंजना मोठी झाली. त्यामुळे अवैध उत्सखननाला तिचा विरोध असल्याचे विजू यांनी सांगितले.

अंजना कृष्णा या त्यांच्या गावासह परिसरातील पहिल्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या आई जिल्हा न्यायालयात लिपीक आहेत. जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या मुलांमध्येही अंजना या पहिल्या अधिकारी ठरल्या आहेत. याविषयी बोलताना विजू म्हणाले, आम्ही सर्वसाधारण आयुष्य जगत आलो आहोत. अंजना खूप धाडसी आणि सरळमार्गी आहे. प्रामाणिक आयुष्य जगण्यावर तिचा विश्वास आहे. त्याचवेळी इतरांना त्रास होईल किंवा अडचण होईल, असे ती कधी वागत नसल्याचेही वडिलांनी स्पष्ट केले.

"IPS Anjana Krishna’s viral video confronting Ajit Pawar sparks political and public reactions."
IPS Anjana krishna News : अंजना कृष्णा अन् अजितदादांमधील संवादातील 'कच्चा' मुद्दा रोहित पवारांनी हेरला; तिथंच गडबड झाल्याचं स्पष्टच सांगितलं...

अजित पवार यांच्याबाबतच्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंजना खूप शांत आणि आनंदी होती, असे विजू यांनी सांगितले. या घटनेनंतर कुणीही आपल्या मुलीविषयी चुकीची प्रतिक्रिया दिली नाही, याचा आनंद वाटतो. या घटनेच्या बातम्या झाल्यानंतर आम्हाला मित्र आणि कुटुंबीयांचे अनेक फोन आले. प्रत्येकाने मुलीविषयी अभिमान असल्याचे सांगितल्याचे विजू म्हणाले.

"IPS Anjana Krishna’s viral video confronting Ajit Pawar sparks political and public reactions."
Nepal protest news : दोन केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा, मित्रपक्षही साथ सोडणार; PM ओलींना मोठा धक्का

दरम्यान, घटनेबाबत अद्याप अंजना कृष्णा यांनी एकदाही प्रतिक्रिया दिलेली नाही. विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील काही आमदार व मंत्र्यांनीही त्यांची पाठराखण केली आहे. अजित पवार यांनीही या घटनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांकडून कुर्डू गावातील काही जणांवर गुन्हाही दाखल केला आहे. काही ग्रामस्थांनी अंजना कृष्णा यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com