IPS Vaibhav Nimbalkar : आयपीएस वैभव निंबाळकर यांना थेट 'डिआयजी'पदी बढती!

IPS Vaibhav Nimbalkar : "आजवरच्या प्रवासात सद्‌गुरु वामनराव पै यांचे विचार, माझ्या कुटुंबीयांनी खंबीर साथ दिली."
IPS Vaibhav Nimbalkar
IPS Vaibhav NimbalkarSarkarnama

पुणे : पुण्याचे रहिवासी असलेले व सद्या आसाम राज्य केडरचे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी वैभव निंबाळकर यांची आता पोलिस महानिरीक्षकपदी (डिआयजी) पदावर बढती झाली आहे. निंबाळकर हे मूळ पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्‍यामधील सणसर या छोट्याश्या गावचे रहिवासी आहेत.

वैभव निंबाळकर हे २००९ वर्षीच्या आयपीएस तुकडीतील ते अधिकारी आहेत,. निंबाळकर सद्या आसाम राज्याच पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आसाममधील कचार जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक होते.

जुलै 2021 च्या दरम्यान आसाम-मिझोरम सीमावादातून, दोन राज्यांमध्ये अकस्मातपणे उसळलेल्या दंगलीत आसाम पोलिस दलातील 6 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यु घडून आला होता. तर याच दंगली दरम्यान पोलिसाचे कर्तव्य निभावताना निंबाळकर यांना गोळी लागली होती. यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. यानंतर उपचारातून ते बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा सेवेत रुजू झाले आहेत.

IPS Vaibhav Nimbalkar
Sharad Pawar : विद्यार्थ्यांनी व्यथा मांडताच पवारांनी थेट मुख्यमंत्री शिंदेना लावला फोन!

सध्या निंबाळकर आसाम पोलिस दलात "व्हिजीलन्स ऍन्ड ऍन्टी करप्शन" विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून काम पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना "डिआयजी' पदी बढती मिळाली आहे.

बढतीबद्दल बोलताना निंबाळकर म्हणाले, "डिआयजी'पदी नियुक्ती झाल्याचा खूप आनंद वाटतो. या प्रवासात व माझ्यावरील हल्ल्याच्या घटनेत सद्‌गुरु वामनराव पै यांचे विचार, जीवन विद्या मिशन परिवार, माझे कुटुंबीयांनी खंबीर साथ दिली. यापुढेही जास्तीत जास्त लोकाभिमुख प्रशासन देऊन सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्यावर माझा भर असेल, अशा भावना निंबाळकर यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com