दरेकरांविरोधात गुन्हा दाखल; फडणवीसांनी काल व्यक्त केली होती भीती

Pravin Darekar | Mumbai Bank | BJP | Devendra Fadnavis : फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला २४ तास देखील उलटलेले नाहीत...
Pravin Darekar
Pravin DarekarSarkarnama

मुंबई : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावरील आरोपांची राज्य अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत केली. मात्र, त्यांच्या घोषणेवर समाधान न झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप नेत्यांनी सभात्याग केला. पण तो करत असतानाच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल करून त्यांनाही अडकविण्यात येणार असल्याचा नवा गौप्यस्फोट त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटाला अजून २४ देखील उलटले नाहीत तोच प्रविण देरकर यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बँक निवडणूक फसवणुक प्रकरणी दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबै बँकेसाठी प्रवीण दरेकर यापूर्वी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. यावेळी देखील त्यांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरला होता. मात्र यंदा त्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती.

Pravin Darekar
भाजपवर ओढावू शकते नामुष्की; दोन घरातच चार मंत्रिपदांसाठी लॉबिंग

प्रविण दरेकर यांना या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीसही बजावली होती. 'या नोटिशमध्ये 'आपण मजूर आहात की नाही,' अशी विचारणा करण्यात आली होती. याशिवाय यापूर्वीच प्रवीण दरेकर मजूर नसल्याचे सांगत त्यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. असे म्हणतं मजुरीचे काम न करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्यात यावे,'' असे आदेश उच्च न्यायालयाकडूनही देण्यात आले होते.

Pravin Darekar
हिजाबवर बंदी योग्यच- कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

दरेकर यांनी मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले होते. तसेच त्यांनी याच प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे. दुसरीकडे विधान परिषद सदस्य आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. सहकार विभागाने दरेकर यांना अपात्र ठरवताना याच बाबींकडे लक्ष वेधत तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही असे आपल्या आदेशात स्पष्ट केले होते. त्यानंतर आता दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com