विधानसभा अध्यक्षपदाचा मान भाजपला! राज्याच्या इतिहासात प्रथमच महिलेला संधी

विधानसभा अध्यक्षाचा मान भाजपच्या महिला आमदाराला मिळाला असून, राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे.
Ritu Khanduri elected as Assembly Speaker
Ritu Khanduri elected as Assembly Speaker Sarkarnama
Published on
Updated on

डेहराडून : विधानसभा अध्यक्षपदाचा (Assembly Speker) मान राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आमदाराला मिळाला आहे. भाजपच्या रितू खांडुरी (Ritu Khanduri) यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून खांडुरी नवीन इतिहास घडवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात भाजपने (BJP) सत्ता मिळवली आहे. पुन्हा एकदा पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री (Chief Minister) पदाची माळ पडली आहे. पंतप्रंधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाची नुकतीच शपथ घेतली. धामी हे खऱ्या अर्थाने 'बाजीगर' ठरले आहेत. कारण विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही ते पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत. आता भाजपने विधानसभा अध्यक्षपदाचा मान रितू खांडुरी यांना दिला आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. या वेळी बोलताना मुख्यमंत्री धामी म्हणाले की, विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्याबद्दल मी रितू खांडुरी यांचे अभिनंदन करतो. त्या अतिशय चांगल्या पद्धतीने सभागृह चालवतील. त्यांच्या नेतृत्वाखाली आपले सभागृह नवा इतिहास घडवेल.

Ritu Khanduri elected as Assembly Speaker
मोदींच्या विश्वासू अधिकाऱ्याला लॉटरी! आधी विधान परिषद अन् आता थेट मंत्रिपद

धामी यांचा शपथविधी नुकताच डेहराडूनमधील परेड मैदानावर झाला. या वेळी मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह योगी आदित्यनाथ आणि मनोहरलाल खट्टर हे उपस्थित होते. धार्मी हे ४६ वर्षांचे असून, उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) गुरमितसिंग यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. धामी हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्यासोबत आठ कॅबिनेट मंत्र्यांचाही आज शपथविधी झाला. यात सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, धनसिंह रावत, रेखा आर्य आणि गणेश जोशी या आधीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा समावेश आहे. याचबरोबर रामचरण दास, सौरभ बहुगुणा आणि प्रेमचंद अगरवाल या नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

Ritu Khanduri elected as Assembly Speaker
वाढता वाढता वाढे..! पेट्रोल, डिझेल 5 दिवसांत 3.20 रुपयांनी महागलं; सुमारे 25 रुपये वाढ अपेक्षित

उत्तराखंडमध्ये भाजपने 70 पैकी 47 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले. परंतु, त्यांचा खातिमा मतदारसंघात पराभव झाला असला तरी ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि ज्येष्ठ नेते सत्पाल महाराज हे शर्यतीत होते. या चौघांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री निवडीसाठी आमदारांची बैठक पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह आणि पक्षाच्या नेत्या मीनाक्षी लेखी या केंद्रीय निरीक्षक म्हणून बैठकीला हजर होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी धामी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com