Israel Hamas War News : 'हमास'चं समर्थन करणाऱ्या इराणला अमेरिकेचा 'दे धक्का'; नव्या निर्बंधांची घोषणा!

Israel Hamas War Updates : इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि यूएव्ही कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने नवीन निर्बंध...
Israel Hamas War
Israel Hamas WarSarkarnama
Published on
Updated on

Israel Palestine War News : इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धात अमेरिकाही हस्तक्षेप करत आहे. अमेरिकेने यापूर्वीच इस्राईलला शस्त्रे पुरवली आहेत. यानंतर काल (18 ऑक्टोबर) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. या भेटीच्या दिवशीच अमेरिकेने हमासवर नवीन निर्बंध लादल्याचे जाहीर केले होते. आज अमेरिकेने हमासच्या समर्थन करत असलेल्या इराणलाही मोठा धक्का दिला आहे.

अमेरिकेकडून इराणवर नवीन निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. युक्रेन युद्धादरम्यान इराणची घातक पावले आणि इस्राईलमध्ये सुरू असलेले युद्ध पाहता निर्बंध लादणे आवश्यक होते, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि यूएव्ही कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने नवीन निर्बंध लादत असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी ट्विट केले आहे. (Latest Marathi News)

Israel Hamas War
Israel vs Hamas War : इस्राईल-हमास युद्धाचा थेट भारतावर परिणाम; हजारो रोजगार जाण्याची भीती !

इस्राईल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, अमेरिकेने इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन कारवायांना लक्ष्य करत नवीन निर्बंध जारी केले आहेत. इस्राईल आणि आखातीतील मित्र राष्ट्रांना तेहरानच्या धोक्याचा, तसेच युक्रेनमधील शस्त्रांच्या "विनाशकारी" प्रभावाचा प्रतिकार करणे हे निर्बंधांचे उद्दिष्ट आहे, असे अमेरिकेचे मत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हमासच्या दहशतवाद्यांना इराणकडून प्रशिक्षण

यूके आणि इतर युरोपीय संघातील सहयोगी 45 देशांसह एका निवेदनात वॉशिंग्टनने युद्धात इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामुळे जागतिक स्थैर्य धोक्यात येईल आणि प्रादेशिक तणाव वाढेल," असे या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही इराणच्या क्षेपणास्त्रे आणि मानवरहित हवाई हल्ल्यांची शक्यता, दहशतवादी संघटनांना दिलेले समर्थन यामुळे विनाशकारी परिणाम पाहत आहोत, ज्यामुळे इस्राईल आणि आखाती भागातील सुरक्षेला थेट धोका आहे."

Israel Hamas War
Israel vs Hamas War : जगातल्या तब्बल २८ देशांना मान्य नाही इस्राईलचं अस्तित्व; काय आहे कारण ?

इराणच्या ड्रोनचा युक्रेन युद्धावरही परिणाम होतो

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांच्या म्हणण्यानुसार, "इराणच्या ड्रोनने युक्रेन युद्धात "विनाशकारी परिणाम"देखील दाखवले आहेत. गेल्या आठवड्यात इस्रायली नागरिकांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हमासला इराण, तसेच लेबनॉन- हिजबुल्लाहचा पाठिंबा आहे. ज्याने इस्राईल आणि हमास यांच्यातील लढाईत उतरण्याची धमकी दिली आहे.

अमेरिकेने हमास आणि हिजबुल्लाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. इराणच्या शस्त्रास्त्र कारवायांवर संयुक्त राष्ट्रांनी घातलेली बंदी बुधवारी संपुष्टात येत असताना, अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com