Crime News : भाजपच्या माजी मंत्र्यांला कॉलगर्ल्सने दिला चोप? पोलिस म्हणतात...

Goa News : सहा मार्च रोजी गोव्यातील कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
Crime News
Crime NewsSarkarnama

Bjp News : भाजपच्या मध्य प्रदेशातील एक आमदाराला आणि त्याच्या दोन मित्रांना गोव्यात कॉल गर्ल्सने बेदम मारहाण केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काँग्रेसने (Congress) आपल्या ट्विटरवरुन ही बातमी पोस्ट केली आहे. ही बातमी पोस्ट करत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

सहा मार्च रोजी कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. झाले असे की मध्य प्रदेशातील एक माजी मंत्री त्यांच्या दोन मित्रांसोबत फिरण्यासाठी गोव्यात आले होते. या नेत्याने एका दलालाच्या माध्यमातून मुंबईतून दोन कॉल गर्ल्सना बोलावल्याचे सांगण्यात येत आहे. दलालाशी झालेल्या चर्चेपेक्षा कॉलगर्ल्स निर्धारित वेळेपूर्वी निघून जाऊ लागल्याने नेता आणि त्याच्या मित्रांचा कॉलगर्ल व दलालाशी वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

Crime News
H3N2 Influenza : नव्या विषाणूने वाढवलं टेन्शन ; मास्क वापरा, नीती आयोगाचं आवाहन !

कॉल गर्ल्सना पैसे देण्याची वेळ आली तेव्हा या नेत्याने दलालाच्या खात्यात ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर केल्याचे सांगितले. मात्र, रक्कम मला मिळालीच नाही, असे दलाल म्हणाला. त्यानंतर हा नेता व त्याचे मित्र हॉटेलच्या वरच्या मजल्यावर घेतलेल्या खोलीत जाऊन लपून बसले. मात्र, कॉलगर्ल्सनी त्यांना शोधून काढले आणि बेदम चोप दिला. पैसे न देताच हॉटेलमधून पोबारा करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, कॉलगर्ल्सनी त्यांना चांगलाच चोप दिल्याचे सांगितले जात आहे.

मध्य प्रदेशाचा माजी मंत्री असल्याने याप्रकरणी पोलिसांत (Police) कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची चर्चा गोव्यातील कळंगुट परिसरात रंगली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Crime News
ED News: साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत 'ईडी' कोठडी

ही बातमी व्हायरल झाल्यानंतर मध्यप्रदेशच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर हा नेता कोण आहे, यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी गोवा पोलिसांना पत्र पाठवले. त्यानंतर गोवा पोलिसांनी जवळपास दोन दिवस तपास करत मध्य प्रदेश पोलिसांना रिपोर्ट पाठवला आहे. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंतच्या तपासात हे प्रकरण बनावट असल्याचे दिसून आले, असल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com