
Jagdeep Dhankhar news : उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड बेपत्ता आहेत. गायब आहे. त्यांच्या शोधासाठी 'हेबियस कॉर्पस' दाखल करण्याचे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिले.
यासंदर्भात दिल्ली दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कपिल सिब्बल यांच्यात देखील चर्चा झाल्याची माहिती खासदार राऊत यांनी सांगितली. संजय राऊत यांनी जगदीप धनखड यांच्या बेपत्ता असल्याचा दावा केल्यानं देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
जगदीप धनखड हाऊस अरेस्ट आहेत, असा दावा 'सामना'तून करण्यात आला आहे. त्यावर बोलताना सजंय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "अजूनही नवीन उपराष्ट्रपती नसल्याने आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो. जगदीप धनखड हे 21 जुलैपासून बेपत्ता आहेत. राज्यसभेचे चेअरमन आहेत. जगदीप धनखड 21 जुलैला आमच्या समोर आले. त्यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत. त्यानंतर सभागृह स्थगित झालं. त्यांची प्रकृती उत्तम होती. ते काही काळ चिरडले असतील, हास्यविनोद केला असेल, त्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि सायंकाळी सहानंतर त्यांच्या राजीनाम्याची बातमी आली. प्रकृतीचे कारण दिले. हे आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहेठ.
'राजीनामा दिल्यापासून आजपर्यंत जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) कुठे आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे. ते काय करत आहेत? ते कुठे आहेत? ते बरे आहे का? मुळात ते आहे ना? त्यांना कुठं गायब केलं आहे? या शंका आमच्या मनात येत आहेत. देशाचा उपराष्ट्रपती अशापद्धतीने गायब झाला असेल, अन् त्याचा ठावठिकाणा लागत नसेल, तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अशापद्धतीने नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे. तिथली काही परंपरा या लोकांनी सुरू केली आहे का?', असा आरोप संजय राऊत यांनी केला.
'उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना, कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल हे त्यांना भेटले. तेव्हा आम्ही या सर्व गोष्टींवर चर्चा केली. कपिलजी, जगदीप धनखडांचं काय करायचं, कुठे आहे, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. त्यावेळी आमचं असं ठरलं की, 'हेबियस कॉर्पस' दाखल करायचं. ही एक अशी कायदेशीर प्रक्रिया आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती गायब असेल, तर त्या व्यक्तीला सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो. कदाचित अशाप्रकरणचं आम्ही याचिका दाखल करू शकतो, असे संकेत खासदार राऊत यांनी दिले आहेत.
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. उपराष्ट्रपती धनखड यांनी 21 जुलै रोजी संसदेच्या पहिल्या दिवशी राजीनामा दिला व तेव्हापासून जगदीप धनखड यांचा कोणाशी संपर्क आणि संवाद नाही. धनखड राजीनामा दिल्याच्या दिवसापासून गायब आहेत. संसदेतील अनेक खासदारांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण धनखड हे जणू अदृश्य झाले.
देशाच्या माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा खासदारांना व राजकीय कार्यकर्त्यांना नाही, ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. धनखड यांना त्यांच्या राहत्या घरी ‘बंदी’ बनवून ठेवले. ते हाऊस अरेस्ट आहेत. त्यांच्या नातेवाईकांशीही त्यांचा संपर्क होऊ देत नाहीत, असे दिल्लीतील राजकीय वर्तुळातून सांगितले व ते खरे वाटते. आपल्याला नको असलेले विरोधक गायब करण्याची, तुरुंगात डांबण्याची, त्यांचा काटा काढण्याची पद्धत चीन व रशियासारख्या कम्युनिस्ट देशांत आहे.
भगवेकरण सुरू असलेल्या भारतात ही पद्धत आता सुरू झाली असेल तर राहुल गांधींसह इतर सगळय़ांनीच सावध राहायला हवे. लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या भाजपच्या भीष्म पितामहालाही अशाच पद्धतीने गप्प केले गेले. आता राजीनामा दिलेले उपराष्ट्रपती धनखड गायब झाले. भारताची राजकीय व्यवस्था बिघडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.