DSP Dalbir Singh: अर्जुन पुरस्कार विजेते डीएसपी दलबीर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या

Punjab Sangrur DSP Dalbir Singh Dead: ते संगरुर जिल्ह्यात कार्यरत होते.
DSP Dalbir Singh
DSP Dalbir SinghSarkarnama
Published on
Updated on

Jalandhar: पंजाबमध्ये डीएसपींची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला आढळला आहे. त्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. एक गोळी त्यांच्या गळ्यात अडकली होती.

दलबीर सिंह असे मृत डीएसपींचे नाव असून ते संगरुर जिल्ह्यात कार्यरत होते. ते जालंधरचे रहिवाशी होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. दलबीर सिंह हे अर्जुन पुरस्कार विजेते होते.

सोमवारी दलबीर सिंह यांचा मृतदेह बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्यावर पडलेला आढळला. काही दिवसापूर्वी दलबीर सिंह यांचे जालंधर येथील एका गावातील नागरिकांशी वाद झाला होता. त्यावेळी दलबीर सिंह यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून हे प्रकरणावर पडदा टाकला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दलबीर सिंह यांच्या हत्येनंतर त्यांचे रिव्हॉल्व्हर गायब आहे.याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त बलविंदर सिंह रंधावा म्हणाले, "बस्ती बावा खेलजवळ कुणाचातरी मृतदेह पडल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. पोलिसांचे पथक त्याठिकाणी पोहचल्यानंतर तो मृतदेह डीएसपी दलबीर सिंह यांचा असल्याचे समजले. सुरवातीला हा अपघात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, मात्र शवविच्छेदन अहवालात त्यांच्या गळ्यात गोळी आढळली आली.

31 डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांच्या पार्टीनंतर दलबीर सिंह यांना त्यांचे मित्र त्यांना बसस्थानकाच्या मागे सोडून गेले होते. घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षारक्षक उपस्थित नव्हते. पोलिस त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करीत आहेत. पण अद्याप कुठलाही सुगावा मिळालेला नाही.

DSP Dalbir Singh
Babanrao Gholap : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार? बबनराव घोलपांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com