Babanrao Gholap : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार? बबनराव घोलपांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

CM Shinde : राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; जाणून घ्या एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत काय म्हटलं आहे
Babanrao Gholap CM Shinde
Babanrao Gholap CM ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उद्धव ठाकरे गटाचे बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आहे. विशेष म्हणजे या दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे आणखी एक धक्का देणार की काय? यावरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण, अनेक दिवसांपासून बबनराव घोलप(Babanrao Gholap) हे ठाकरे गटात काहीसे नाराज असल्याचीही चर्चा होती. त्यातच ही भेट झाल्याने चर्चांनी जोर धरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Babanrao Gholap CM Shinde
Raksha Khadse : रावेरमधून गिरीश महाजनांना उमेदवारी मिळाल्यास रक्षा खडसेंची 'ही' असणार भूमिका, म्हणाल्या...

मात्र ही भेट राजकीय नव्हती असं एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलेलं आहे. तरीही सुरुवातीस अशा भेटी या कधीच राजकीय असल्याचं उघडपणे सांगितलं जात नसतं, परंतु आतापर्यंतच्या घटना पाहता कालांतराने मोठ्या राजकीय घटना घडल्याचे या राज्याचे पाहिलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? -

'त्यांचे समाजकल्याण विभागाशी निगडीत त्यांच्या समाजाचे काही प्रश्न होते. ते चर्मकार समाजाच्या देशपातळीवरील संघटनेचे घटनेचे अध्यक्ष आहेत. यासंदर्भातील तीन-चार विषय घेऊन ते माझ्याकडे आले होते. त्यामुळे ही अशी कुठलीही राजकीय भेट नाही.' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

राजकीय चर्चांना उधाण का?

बबनराव घोलप यांनी सप्टेंबर महिन्यातच शिवसेना(उबाठा) संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे. ते शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदावरून हटवल्यामुळे नाराज असल्याचं बोललं जात आहे. कारण, याच शिर्डी मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढण्यासाठी बबनराव घोलप इच्छुक होते. भाऊसाहेब वाघचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून ते नाराज असल्याचंही बोललं जात आहे.

Babanrao Gholap CM Shinde
Ajit Pawar : अजित पवारांनी जबाबदारी सोपवल्यानंतर कोते मैदानात; विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार

विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी शिर्डी दौरा केला, तेव्हा बबनराव घोलप यांना डावललं गेल्याचंही दिसून आलं होतं. त्या दरम्यान घोलप पिता-पुत्राने शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com