Omar Abdullah : ओमर अब्दुल्लांनी शपथ मोडली; वडिलांना खोटं ठरवत विधानसभेसाठी मोठा निर्णय

Jammu and Kashmir Assembly Election 2024 Farooq Abdullah : जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होणार असून 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.  
Omar Abhullah, Jammu and Kashmir Election
Omar Abhullah, Jammu and Kashmir ElectionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे जुने भिडू पुन्हा एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षांनी आघाडी तर भाजप आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षासमोर आव्हान उभे केले आहे. पण या घडामोडी सुरू असताना कॉन्फरन्सचे नेते व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपली शपथ मोडली आहे.

केंद्र सरकारने राज्यातून कलम 370 हटवल्यानंतर ओमर यांच्यासह माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेपर्यंत विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. एवढेच नाही तर माजी मुख्यमंत्री व उमर यांचे वडील फारुख अब्दुल्ला यांनी मुलाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते.

Omar Abhullah, Jammu and Kashmir Election
Champai Soren : ‘कोल्हान टायगर’ची डरकाळी; आघाडीचा ‘तो’ बालेकिल्ला भाजप उध्वस्त करणार

निवडणुकीचा कार्यकम जाहीर होताच ओमर अब्दुल्ला यांनी आपला शब्द फिरवला आहे. पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या 32 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत ओमर यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते गांदरबल मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.  

मेहबुबा मुफ्ती मात्र अजूनतरी आपल्या शपथेवर कायम आहेत. त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून मुलगी इल्तिजा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या पक्षाने कुणाचीही आघाडी केलेली नाही. भाजपनेही एकला चलोची भूमिका घेतली आहे. तर काँग्रेस आणि एनसीमध्ये झालेल्या आघाडीत अनुक्रमे 32-51 असा जागावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित झाला आहे. त्यांच्यासोबत माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्ष आणि जम्मू-काश्मीर नॅशनल पॅंथर्स पक्षही असून त्यांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे.

Omar Abhullah, Jammu and Kashmir Election
Champai Soren : ‘कोल्हान टायगर’ची डरकाळी; आघाडीचा ‘तो’ बालेकिल्ला भाजप उध्वस्त करणार

तीन टप्प्यांत निवडणूक

जम्मू आणि काश्मीरमध्ये 90 जागांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशी तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. 2014 नंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यात 2018 पासून राज्यपालांचे शासन आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या निवडणुकीतही मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडतील, अशी आशा निवडणूक आयोगाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com