
Jammu-Kashmir Accident : जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी (ता.24) लष्कराच्या ट्रकचा मोठा अपघात झाला. या गंभीर अपघातात पाच जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. पूंछ सेक्टरमधील मेंढर भागात लष्कराचा ट्रक चुकून 300 फूट खोल दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती 'व्हाइट नाइट कॉर्प्स'नं एक्सवर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या या ट्रकमध्ये 8 ते 10 जवान होते. हा ट्रक नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोरा पोस्टकडे जात असताना 11 एमएलआयच्या घोरा पोस्टजवळ अपघात (Accident) झाला. यावेळी लष्कराचा ट्रक जवळपास 300 ते 350 फूट खोल दरीत कोसळला.
या घटनेची माहिती मिळताच तत्काळ बचाव मोहीम सुरु करण्यात आली आहे. बचाव पथकाने घटनास्थळी पोहोचून जखमींसाठी मदत कार्य सुरु केले. सैन्य दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
या भीषण अपघातात 5 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर इतर जवान जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दिली.
तसंच त्यांनी मृत जवानांबद्दल शोक व्यक्त केला. व्हाईट नाईट कॉर्प्सने पोस्टमध्ये लिहिलं 'पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना वाहन अपघातात 5 शूर जवानांच्या दुःखद मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो. जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे.
दरम्यान, मागील महिन्यात (4 नोव्हेंबर) देखील अशाच पद्धतीच्या अपघातात जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. कालाकोटच्या बडोग गावाजवळ हा अपघात झाला, ज्यामध्ये नाईक बद्री लाल आणि हवालदार जय प्रकाश गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान लाल यांचा मृत्यू झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.