Asaduddin Owaisi Statement : आता मुंबई, चेन्नई, हैदराबाद केंद्रशासित प्रदेश होतील...! ओवैसीचं मोठं विधान

Owaisi Upset after removal of Article 370 : भाजपला कोणी रोखू शकत नाही ; कलम 370 हटवल्यानंतर ओवैसी नाराज..
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

Asaduddin Owaisi News : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आता भाजपला कोणीही रोखू शकत नाही. लवकरच चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता हे केंद्रशासित प्रदेश बनवले जातील, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवला आहे.

यावेळी लडाखच्या उदाहरणाचा संदर्भ देत असदुद्दीन ओवैसी Asaduddin Owaisi म्हणाले की, त्यावर उपराज्यपालांचे शासन आहे आणि तेथे कोणतेही लोकशाही प्रतिनिधित्व नाही. त्यांनी 2019 च्या परिसंवादात सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीचा हवाला देत म्हटले की, सार्वजनिक चर्चा ही त्यांच्या अनुपस्थितीत सत्ता मिळवणाऱ्यांसाठी नेहमीच धोक्याची असते.

Asaduddin Owaisi
Cricketnama 2023 : राष्ट्रवादीच्या करेक्ट टायमिंगमुळं 'Team BJP' पराभूत!

संघराज्य म्हणजे प्रांताला स्वतःचा आवाज आहे आणि स्वतःच्या क्षमतेनुसार कार्य करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. विधानसभेची जागा संसद कशी घेऊ शकते? ज्या प्रकारे कलम 370 Section 370 रद्द करण्यात आले, ते त्यांच्यासाठी घटनात्मक नैतिकतेचे उल्लंघन आहे, असेही ओवैसी यांनी सांगितले. कलम 370 रद्द केल्यामुळे सर्वात मोठे नुकसान जम्मूच्या डोग्रा आणि लडाखच्या बौद्ध समुदायांचे होईल.

ज्यांना लोकसंख्याशास्त्रीय बदलांना सामोरे जावे लागेल. राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी कालमर्यादा का नाही? जम्मू-काश्मीरमध्ये दिल्ली (केंद्र) राजवटीला पाच वर्षे झाली आहेत. राज्यात लवकरात लवकर 2024 च्या विधानसभा निवडणुकांसह निवडणुका व्हाव्यात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य हा भारताचा अविभाज्य भाग आहे यात शंका नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याचा केंद्राशी विशेष घटनात्मक संबंध नाही. काश्मीरची संविधान सभा विसर्जित करून हे घटनात्मक नाते कायम केले गेले असल्याचे ओवैसींनी म्हटले आहे.

( Edited by Amol Sutar )

Asaduddin Owaisi
Dharavi Redevelopment : "धारावीकरांना घर मिळू नये, हीच उद्धव ठाकरेंची इच्छा''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com