Dharavi Redevelopment : "धारावीकरांना घर मिळू नये, हीच उद्धव ठाकरेंची इच्छा''

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगून टाकलं
Devendra Fadanvis,uddhav thackeray
Devendra Fadanvis,uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

Dharavi Redevelopment News : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत अदानी कार्यालयावर उद्धव ठाकरे मोर्चा नेणार आहेत. पुनर्विकासाचे टेंडर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले आहे. धारवीकरांना घरच मिळू नये, हीच उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे, अशा कठोर शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले.

धारवीकारांसाठी आयोजित केलेल्या मोर्चात मुंबईकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे. तसेच धारवीकारांचा विकास व्हावा मोदींच्या मित्राचा नव्हे, असे म्हटले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.धारावीसाठी जे टेंडर होते ते ठाकरे सरकारनेच रद्द केले. नव्या टेंडरच्या अटी शर्ती ठाकरे यांच्या सरकारनेच ठरवल्या होत्या, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis,uddhav thackeray
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीस कडाडले, 370 वर वेगळी भूमिका घेतल्याची केली आठवण

जर धारवीकरांना घर मिळाले तर ते आपल्या मागे येणार नाहीत, अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटत आहे. त्यामुळे ते अडथळा निर्माण करत आहेत. विकासाला नेहमीच उद्धव ठाकरेंचा विरोध राहिला आहे. कोकणात येणाऱ्या प्रकल्पाला विरोध केला. आणि कोकणातील दुसरे ठिकाण प्रकल्पासाठी सुचवले. मात्र, जेव्हा प्रकल्प तेथे आला तेव्हा तेथे मोर्चा काढून विरोध केला, हीच नीती उद्धव ठाकरेंची असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला.

कांदाप्रश्नी विरोधक आक्रमक झाले आहेत. कांद्यावरील निर्यात उठवावी, अशी मागणी केली जाते आहे. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, सरकार हे शेतकरी हिताचा विचार करते. देशात असलेला कांद्याचे उत्पन्न कमी आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त किमतीत कांदा विकत घ्यावा लागेल. व्यापारी शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार नसतील तर केंद्र सरकार योग्य भावात कांदा खरेदी करेल,असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. तसेच शदर पवार हे कृषी मंत्री असताना दोन वेळा कांदा निर्यादीवर बंदी घातली होती, याची आठवण देखील फडवणवीसांनी करून दिली.

Edited by Roshan More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com