Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमध्ये बस अपघातात 36 जणांचा मृत्यू; मोदींनी केली मदतीची घोषणा

Jammu Kashmir Bus Accident: या दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 17 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
MP Modi
MP ModiSarkarnama

Delhi News: जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात एका बसचा भीषण अपघात झाला असून, 250 मीटर खोल दरीत ही बस कोसळली. या दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 17 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

जम्मूवरून किश्तवाडकडे ही बस जास असताना मध्ये दोडा जिल्ह्याजवळ वळणावळणाचे रस्ते असल्याने ड्रायव्हरच बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांत्वन व्यक्त केलं असून, या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा मोदींनी केली आहे.

दरम्यान, यातील काही जखमी प्रवाशांना दोडा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर काहींना किश्तवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये काय म्हटलं ?

"जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघात हा दुःखदायक आहे. या दुर्घटनेत ज्या कुटुंबांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं, त्यांच्याप्रती मी सांत्वन व्यक्त करतो. यामध्ये जे जखमी झाले आहेत, ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जातील," असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Edited by : Ganesh Thombare

MP Modi
Maharashtra Politics : शरद पवार- फडणवीस अन् जरांगे पाटीलही एकाच दिवशी कोल्हापुरात...; राजकीय फटाके फुटणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com