Jammu Kashmir Election : "इतिहासात पहिल्यांदाच…" राहुल गांधींचं जम्मू-काश्मीरमधील जनतेला मतदान करण्याचं आवाहन

Rahul Gandhi On Jammu Kashmir Election 2024 : "जम्मू-काश्मीरमधील माझ्या बंधू-भगिनींनो, आज राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्याचा दर्जा काढून घेऊन केंद्रशासित प्रदेश करण्यात आला, हा तुमच्या सर्वांच्या घटनात्मक अधिकारांचा भंग असून हा जम्मू-काश्मीरचा अपमान आहे."
Rahul Gandhi On Jammu Kashmir Election 2024
Rahul Gandhi On Jammu Kashmir Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज बुधवार (ता.18 सप्टेंबर) सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. 90 पैकी 24 जागांसाठी आज मतदान होणार आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे.

'मोठ्या संख्येने घराबाहेर पडा आणि आपला लोकशाही हक्क बजावा' असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय यावेळी त्यांनी 370 रद्द केल्याचा मुद्द्याची आठवण करून देत जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आणि केंद्रशासित प्रदेश रद्द करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन केलं आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून हे आवाहन केलं आहे.

Rahul Gandhi On Jammu Kashmir Election 2024
PM Narendra Modi : "समाजात फूट पाडणाऱ्यांना..."; सरन्यायाधीशांच्या घरातील गणपती पूजेच्या वादावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) माझ्या बंधू-भगिनींनो, आज राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याचा दर्जा काढून घेऊन केंद्रशासित प्रदेश करण्यात आला आहे. हा तुमच्या सर्वांच्या घटनात्मक अधिकारांचा भंग असून हा जम्मू-काश्मीरचा अपमान आहे.

इंडियाला दिलेले तुमचे एक मत, तुमचे हक्क परत करणार, रोजगार उपलब्ध करून देणार, महिलांना अधिक सक्षम बनवणार आणि तुम्हाला 'अन्यायाच्या काळातून' बाहेर काढणार. जम्मू-काश्मीरला पुन्हा समृद्ध बनवू. आज मोठ्या संख्येने घराबाहेर पडा आणि आपला लोकशाही हक्क बजावा, इंडिया आघाडीला (India Alliance) मतदान करा." असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com